Join us

DDLJ चा 'बिहाईंड द सीन' Video होतोय व्हायरल, काजोलची धमाल-मस्ती पाहून येईल हसू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2024 16:53 IST

DDLJ सिनेमावेळी काजोलची सुरु होती धमाल, इमोशनल सीन्समध्ये शाहरुखलाही हसवलं

अभिनेत्री काजोल (Kajol) ही सगळ्यांचीच आवडती अभिनेत्री असेल. चुलबुली स्वभावाची काजोल खऱ्या आयुष्यातही तशीच असते. तिच्या अनेक मुलाखतींमधून ती किती कँडिड आहे हे दिसतंच. ९० च्या काळात काजोलची शाहरुख खानसोबत (Shahrukh Khan) छान जोडी जमली होती. दोघं एकत्र आले म्हणजे सिनेमा हिटच होणार असंच जणू समीकरण होतं. त्यांच्या या जोडीची खरी सुरुवात 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' (DDLJ) मधून झाली. या आयकॉनिक सिनेमाच्या अनेक आठवणी आहेत. 

DDLJ चा एक BTS व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये शाहरुख आणि काजोल धमाल करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही सिनेमातील खरे सीन्स आठवतील. पण त्या सीन्समागे हे दोघं काय मजा करत होते ते हा व्हिडिओ पाहून कळेल आणि हसूही येईल. तसंच यात काजोलचा बिंधासत स्वभाव पाहायला मिळत आहे.कधी ती एस्केलेटरवर सिनेमातील गाणं गुणगुणत आहे. तर कधी इमोशनल सीनवेळी शाहरुख-काजोल हसताना दिसत आहेत. अगदी दिग्दर्शक आदित्य चोप्रा, कोरिओग्राफर सरोज खानसोबतही काजोल धमाल करताना दिसत आहे. 

हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी लिहिले, 'काजोल आजही अशीच चुलबुली वाटते','जुन्या आठवणी ताज्या झाल्या.' 1995 साली 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' प्रदर्शित झाला होता. सिनेमाला २९ वर्ष झाली आहेत. तरी आजही चाहत्यांमध्ये सिनेमाची क्रेझ आहे. आदित्य चोप्राने सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. अमरीश पूरी यामध्ये काजोलच्या वडिलांच्या भूमिकेत होते. सिनेमातील ट्रेनचा सीन आयकॉनिक ठरला. 

टॅग्स :काजोलशाहरुख खानबॉलिवूडसिनेमासोशल मीडिया