Join us

मेघना गुलजारच्या 'छपाक'चा फर्स्ट लूक आऊट, अशी दिसणार दीपिका पादुकोण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 10:39 AM

दीपिका पादुकोण आणि मेघना गुलजार दिग्दर्शित 'छपाक' सिनेमाचे पहिले पोस्टर आऊट झाले आहे. हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे

ठळक मुद्दे10 जानेवारी 2020ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेयासिनेमातून अ‍ॅसिड हल्ल्यासारख्या घटनांचा निषेध नोंदवण्यात येणार आहे

दीपिका पादुकोण आणि मेघना गुलजार दिग्दर्शित 'छपाक' सिनेमाचे पहिले पोस्टर आऊट झाले आहे. हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे. अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी अग्रवाल हिचा जीवन संघर्ष या सिनेमातून पडद्यावर दाखवण्यात येणार आहे. लक्ष्मीवर 15 वर्षांची असताना लग्नाला नकार दिला म्हणून तिच्यावर अ‍ॅसिड हल्ला करण्यात आला होता. यासिनेमातून अ‍ॅसिड हल्ल्यासारख्या घटनांचा निषेध नोंदवण्यात येणार आहे. 

'छपाक'मधूनदीपिका पादुकोण निर्मिती क्षेत्रात पदार्पण करतेय. होळीच्या दिवसापासून दीपिकाने दिल्लीतून या सिनेमाचे शूटिंग सुरु केले आहे. 'छपाक'मध्ये विक्रांत मेस्सी दीपिकाच्या पतीची आलोक दीक्षितची भूमिका साकारत आहे. हा सिनेमा 10 जानेवारी 2020ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच या सिनेमाच्या निमित्ताने दीपिका आणि मेघना गुलजार पहिल्यांदाच एकत्र काम करतायेत. मेघनाने काही दिवसांपूर्वी दीपिका पादुकोणसंदर्भातील एक गोष्ट सांगितली होती. मेघनाने ज्यावेळी दीपिकाला 'छपाक'ची कथा सांगितली त्यावेळी दीपिकाला अश्रू अनावर झाले होते असे मेघनाने सांगितले.  

नुकताच पार पडलेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात मेघना गुलजारच्या 'राझी' सिनेमाने आपली छाप पाडली.  अनेक  अ‍ॅवॉर्ड राझीने आपल्या नावावर केले. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून राझीसाठी आलिया भटला गौरविण्यात आले तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकचा पुरस्कार 'राझी'साठी मेघनाला देण्यात आलाय. त्यामुळे दीपिका आणि मेघनाच्या 'छपाक' सिनेमाकडून त्यांच्या फॅन्सना बऱ्याच अपेक्षा असतील यात काही शंका नाही तसेच या सिनेमाची वाट ते मोठ्या आतुरतेने पाहत असतील.

टॅग्स :दीपिका पादुकोणछपाक