Join us

'ही आपली पत्नी नाहीच?' २० वर्ष संसार केल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्यासमोर आलं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 1:54 PM

'आशिकी' सिनेमातील भूमिकेमुळे तो प्रसिद्धीझोतात आला.

बॉलिवूड अभिनेता दीपक तिजोरी (Deepak Tijori) आठवतोय? 'तेरा नाम मेरा नाम' मधून पदार्पण करणारा अभिनेता दीपक तिजोरीने काल ६२ वा वाढदिवस साजरा केला. 'आशिकी' सिनेमातील भूमिकेमुळे तो प्रसिद्धीझोतात आला. बालकलाकार म्हणूनच त्याने अभिनय करिअरला सुरुवात केली. दीपकच्या वैवाहिक आयुष्यात मोठी फसवणुक झाल्याचं मध्यंतरी समोर आलं होतं. 

दीपक तिजोरीचं वैयक्तिक आयुष्य कायमच चर्चेत राहिलं आहे. दीपक आणि त्याची पत्वी शिवानी तोमरमध्ये मतभेद होते. दीपकचं बाहेर अफेअर सुरु आहे असा आरोप शिवानीने लावला होता. त्यानंतर दोघांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु झाली. नंतर जेव्हा दीपकने पत्नीविरोधात काऊंन्सिलर घेतला, तेव्हा त्याला समजले की आपल्या पत्नीने तिच्या पहिल्या पतीला घटस्फोटच दिलेला नाही. म्हणजे दीपक २० वर्षांपासून ज्या महिलेला आपली पत्नी मानत होता ती कायद्याच्या दृष्टीने दुसऱ्याचीच बायको होती. यामुळे त्याला धक्काच बसला.

दीपकची पत्नी शिवानी तोमर ही फॅशन डिझायनर आहे. त्यांना समारा ही मुलगी आहे. २० वर्ष संसार केल्यानंतर दीपक आणि शिवानी यांच्यात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवरुन भांडणं झाली. दोघांनी एकमेकांवर संशय घेतला. शिवानीचं तिच्या योगप्रशिक्षकासोबत अफेअर सुरु असल्याचा संशय दीपकला आला. त्याने शिवानी विरोधात केस फाईल केली तेव्हा शिवानीने पहिल्या पतीला घटस्फोटच दिला नसल्याचं समोर आलं. २०१७ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

दीपकने 'जो जिता वही सिकंदर','गुलाम','खिलाडी','कभी हा कभी ना','अंजाम','बादशाह' अशा अनेक सिनेमात काम केलं आहे. यानंतर त्याने २००३ मध्ये दिग्दर्शनातही पदार्पण केले. मध्यंतरी एका सिनेमाच्या निर्मितीवेळी त्याची फसवणूक झाल्याचंही समोर आलं होतं.

टॅग्स :दीपक तिजोरीबॉलिवूडघटस्फोटलग्न