Join us

अभिनेता दीपक तिजोरीची मुलगीही आहे बॉलिवूड अभिनेत्री, बोल्ड सीनने आली होती चर्चेत; तुम्ही पाहिलं का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 17:25 IST

Deepak Tijori Daughter : दीपक तिजोरीला सुंदर मुलगी आहे जिचं नाव समारा तिजोरी आहे. समारा लाइमलाईटपासून नेहमीच दूर राहते. ती बॉलिवूडची अभिनेत्रीही नाहीये.

Deepak Tijori Daughter :  ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेता दीपक तिजोरी तर सर्वांनाच आठवत असेल. दीपक तिजोरी एक हिरो म्हणून इंडस्ट्रीत आपली वेगळी जागा निर्माण करू शकला नसला तरी त्याने जी काही कामे केली त्यातून तो आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. दीपक तिजोरी हे इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. 'आशिकी', 'जो जीता वही सिकंदर', 'दो लफ्जों की कहानी', 'कभी हां कभी ना', 'अंजाम', 'खिलाड़ी' आणि 'पहला नशा' सारख्या सिनेमात काम केलं आहे. दीपक तिजोरीचं शिवानी तिजोरीसोबत लग्न झालं होतं. दोघांना समारा (Samara Tijori) नावाची एक मुलगीही आहे.

दीपक तिजोरीला सुंदर मुलगी आहे जिचं नाव समारा तिजोरी आहे. समारा तिजोरी ही बॉलिवूडची अभिनेत्री आहे. ती अभिषेक बच्चनसोबत 'बॉस विश्वास'मध्ये काम केलं होतं. समारा 'ग्रॅंड प्लान' नावाच्या शॉर्ट फिल्ममध्येही दिसली होती. ज्यात तिने लिपलॉक सीन दिला होता. ती सोशल मीडिया चांगलीच अॅक्टिव असते आणि तिचे फॉलोअर्सही बरेच आहेत. समारा तिचे फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या तिला इन्स्टाग्रामवर २२ हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. समाराचे लेटेस्ट फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. या फोटोंमध्ये समारा साडीच्या लूकमध्ये दिसत आहे.

दीपक तिजोरी स्वत: बऱ्याच वर्षांपासून इंडस्ट्रीतून गायब आहे. तर तो कोणत्या सिनेमातही दिसला नाही. त्याने दिग्दर्शनात हात आजमावला होता. पण त्यातही त्याला यश  मिळालं नाही. काही वर्षांपूर्वी तो कौटुंबिक समस्यांमुळे वादातही सापडला होता. पत्नीसोबत भांडणाची चर्चा झाली होती. इतकंच काय तर प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत गेलं होतं. पण आता तो काय करतो हे क्वचितच कुणाला माहीत असेल. 

टॅग्स :दीपक तिजोरीबॉलिवूडसेलिब्रिटी