Join us

दीपिका पादुकोणने मान्य केली चॅटींगची बाब, ड्रग घेते का विचारल्यावर म्हणाली....

By अमित इंगोले | Published: September 26, 2020 3:26 PM

दीपिकाने एनसीबी टीमसमोर तिनेच करिश्मासोबत चॅटींग केल्याचं मान्य केलंय. तसेच तिने ड्रग घेत नसल्याचं सांगितलंय.

ड्रग्स चॅट केसमध्ये दीपिका पादुकोण आणि तिची मॅनेजर करिश्मा प्रकाशी एनसीबीटी टीमकडून चौकशी केली जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीपिकाने हे मान्य केलंय की, करिश्मासोबत तिने चॅट केलं होतं. पण तिने ड्रग्स घेत असल्याचा आरोप फेटाळून लावलाय. असे सांगितले जात आहे की, दीपिकाने हेही मान्य केलंय की, ती एक खास प्रकारची सिगारेट ओढते. पण ड्रग्स घेत नाही.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, दीपिकाची मॅनेजर करिश्माची शुक्रवारी चौकशी झाली होती. यादरम्यान तिनेही सिगारेट ओढण्याची बाब मान्य केली होती. तसेच ती ड्रग्स घेत नसल्याचं तिने सांगितले होते. दीपिका आणि करिशमा यांच्यातील २८ ऑक्टोबर २०१७ मधील चॅट समोर आलं आहे. दीपिकाने मान्य केलंय की, हे चॅट तिनेच केलंय. जेव्हा दोघींना समोरासमोर बसवून ड्रग चॅटबाबत विचारण्यात आले तेव्हा त्या म्हणाल्या की, त्या ड्रग्स घेत नाहीत. डूप घेतात जी एक वेगळ्या प्रकारची सिगारेट असते. ज्यात अनेक गोष्टी भरलेल्या असतात.

असेही सांगितले जात आहे की, एनसीबीच्या टीमने चॅटमध्ये वापरलेल्या हॅश आणि वीड शब्दांबाबत विचारले तर दीपिकाने यावर उडवाउडवीची उत्तरे दिली. दीपिकाने हे मान्य केलंय की, ती डूप(सिगारेट)ओढते. पण त्यात ड्रग्स असतं का यावर तिने काहीही उत्तर दिलं नाही.

समोरासमोर बसवून दीपिका आणि करिश्माची चौकशी आता संपली आहे. टीमने दोघींचा जबाब नोंदवून घेतलाय. पण दीपिकाची आणखी एकदा चौकशी होऊ शकते. दरम्यान, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांचीही एनसीबीकडून चौकशी सुरू आहे. त्यांनीही ड्रग्स घेत नसल्याचं सांगितलंय.

सारा-श्रद्धाची चौकशी

एनसीबीने सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांना एनसीबीच्या एक्सचेंज बिल्डिंगमधील कार्यालयात बोलावलं आहे. साराचे बॉडीगार्डही सुरक्षा व्यवस्था तपासून गेले. दुपारी १२. ३० च्या सुमारास सारा एनसीबीच्या कार्यालयात पोहचली आहे. एनसीबी ऑफिसला जाण्यापूर्वी सारा आणि श्रद्धा दोघीही आपआपल्या वकिलांशी बोलल्या.

दीपिका हॉटेलमधून एनसीबी ऑफिसमध्ये

दुसरीकडे एनसीबीच्या गेस्ट हाऊसमध्ये दीपिका पादुकोणची चौकशी केली जात आहे. मीडियाला टाळण्यासाठी दीपिकाने गेस्ट हाऊसजवळील एका पंचतारांकित हॉटेलची रूम बुक केली होती. हॉटेलमधूनच ती थेट गेस्ट हाउसला पोहोचली. त्या हॉटेलमध्ये ती रणवीर सिंगसोबत होती असून ती लीगल टीमशी सल्लामतलज देखील रात्री करत असल्याची माहिती मिळत आहे. दीपिकाची करिष्मासोबत झालेल्या चौकशी एनसीबीने केलेल्या ड्रग चॅटच्या प्रश्नावर दीपिकाने ते ड्रग चॅट तिचंच असल्याचं कबुली दिली आहे. मात्र अन्य प्रश्नांची उत्तरे देताना दीपिकाने टाळाटाळ केल्याने एनसीबी समाधानकारक नाही आहे. आता सारा, श्रद्धाच्या चौकशीत काय खुलासे होणार हे लवकरच कळेल. 

NCB ऑफिसपर्यंत मीडियाने पाठलाग करू नये म्हणून दीपिकाने वापरली होती 'ही' ट्रिक!

दीपिका - करिष्माची समोरासमोर झाडाझडती, सारा, श्रद्धा देखील एनसीबी चौकशीसाठी पोहचल्या

दीपिका पादुकोणच्या सपोर्टमध्ये समोर आले लोक, #StandWithDeepika होत आहे ट्रेन्ड

धर्मा प्रॉडक्शनच्या क्षितिज प्रसादला NCB ने ताब्यात घेताच करण जोहरने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला...

टॅग्स :दीपिका पादुकोणअमली पदार्थबॉलिवूड