बॉलिवूडच्या आयकॉनिक जोड््यांची यादी बनलीच तर या यादीत एका जोडीचे नाव हमखास असेल. ती म्हणजे, रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण. रिअल लाईफमध्ये रोमॅन्टिक रिलेशन शेअर करणारी ही जोडी तुटली. पण रिल लाईफमधली त्यांची केमिस्ट्री मात्र अतूट आहे. ‘ये जवानी है दीवानी’ आणि ‘तमाशा’ या चित्रपटातील त्यांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड भावली. आजही या जोडीची क्रेजतसूभरही कमी झालेली नाही आणि हेच कारण आहे की, आजही या जोडीला आपल्या चित्रपटात घेण्यासाठी निर्माते-दिग्दर्शक उत्सुक आहेत. तूर्तास दिग्दर्शक अनुराग बासू यांनी बाजी मारलीय. होय, सगळे काही जमून आले तर अनुरागच्या आगामी चित्रपटात रणबीर व दीपिकाची ऑनस्क्रीन जादू पुन्हा एकदा पाहता येईल.
रणबीरने अनुरागसोबत ‘बर्फी’ आणि ‘जग्गा जासूस’ सारखे चित्रपट केले आहेत. दीपिकाने मात्र अनुरागसोबत अद्याप एकही चित्रपट केलेला नाही. त्यामुळे तिने या चित्रपटासाठी होकार दिलाच तर रणबीर-दीपिका-अनुराग या तिगडीचा हा पहिला चित्रपट असेल.