दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाची तारीख ठरलीय. दीपिका आणि रणवीरच्या कुटुंबातले आणि बॉलिवूडचे मोजकेच म्हणजे केवळ ३० लोक या विवाहसोहळ्याला उपस्थित असणार आहेत. येत्या २० नोव्हेंबरला इटलीतील लोम्बा येथे असणाऱ्या लेक कोमो या नयनरम्स ठिकणी ‘दीप-वीर’चा हा शाही विवाहसोहळा संपन्न होणार आहे. तूर्तास दीपिका व रणवीर दोघेही लग्नाबद्दल पूरेपूर गोपनियता बाळगून आहेत. हा लग्नसोहळा अतिशय खासगी व्हावा,असा त्यांचा प्रयत्न आहेत आणि यामुळे हे लग्न भारतात न होता इटलीत होणार आहे. याशिवाय या जोडप्याने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. होय, ‘दीप-वीर’च्या लग्नात मोबाईल बॅन असणार आहे.
होय, डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार,मोबाईलसोबत घेऊन येऊ नये, अशी आग्रहाची विनंती दीपिका व रणवीर आपल्या निमंत्रकांना केली आहे. याचे कारण म्हणजे, लग्नाचा एकही फोटो व्हायरल होऊ नये, अशी त्यांची इच्छा आहे. अनुष्का शर्मा आणि विराटने इटलीत लग्न केले होते. पण या लग्नाला हजर असलेल्या पाहुण्यांनी लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केले होते. अलीकडे सोनम कपूरच्या लग्नातही हेच झाले. यातून धडा घेत, रणवीर व दीपिका पाहुण्यांना मोबाईल न आणण्याची विनंती केली आहे. आयुष्यातील हा सुरेख क्षण अविस्मरणीय व्हावा, त्याचे खासगीपण जपले जावे, हा आणि केवळ हाच रणवीर व दीपिकाचा प्रयत्न आहे. आता या प्रयत्नांत हे जोडपे किती यशस्वी ठरते ते बघूच.