महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या वाढत्या संख्येमुळे 14l एप्रिलच्या रात्रीपासून लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. आजपासून 15 दिवस राज्यातील आवश्यक सेवा वगळता अन्य सेवा बंद राहतील. अशा परिस्थितीत सिनेमा आणि टीव्ही मालिकांचे शूटिंगही बंद राहणार आहे. महाराष्ट्रात कर्फ्यू लावण्यापूर्वी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाले होते.
बंगळुरुला झाले रवाना दीपिका आणि रणवीरचे एअरपोर्टवरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार दीपिाका आणि रणवीर बंगळुरुला रवाना झाले आहेत. दीपिकाचे संपूर्ण कुटुंब बंगळुरुला राहते. मुंबईत शूटिंग बंद असल्यामुळे दीपिका आणि रणवीर कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी बंगळुरुला गेले असावेत.
गेल्या वर्षी जेव्हा लॉकडाऊन झाला तेव्हा दीपिका आणि रणवीर बरेच दिवस मुंबईत घरी राहिले. त्यावेळी दीपिकाने सांगितले होते की ती आपल्या आई-वडिलांना मिस करत होता. लॉकडाउनचे नियमात थोडा सुट मिळल्यावर ती लगेच बंगळुरुला रवाना झाली होती.
दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर यावर्षी दीपिकाचे एक-दोन नव्हे तर अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यावर्षी दीपिका बाहुबली फेम प्रभाससोबतही दिसणार आहे. ऋतिक रोशनसोबत ‘फायटर’ या चित्रपटातही ती झळकणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहेत. याव्यतिरिक्त दीपिका, शाहरुख खानसोबत ‘पठान’ या चित्रपटात धमाका करणार आहे. याशिवाय शकुन बत्राचा एक सिनेमाही तिने केला आहे. रणवीरच्या ‘83’ या सिनेमातही तिची छोटीशी भूमिका असणार आहे.