Join us  

जन्माआधीच दीपिका-रणवीरच्या बाळाची बर्थ डेट समोर, 'या' दिवशी अभिनेत्री बाळाला देणार जन्म?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 6:22 PM

काही महिन्यांपूर्वीच दीपिका आणि रणवीरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. आता दीपिका-रणवीरच्या बाळाच्या जन्माआधीच त्याची बर्थ डेट समोर आली आहे.

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी आहे. हे सेलिब्रिटी कपल लवकरच आईबाबा होणार आहेत. काही महिन्यांपूर्वीच दीपिका आणि रणवीरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. त्यानंतर अभिनेत्रीचे बेबी बंपमधील व्हिडिओही व्हायरल झाले होते. आता दीपिका-रणवीरच्या बाळाच्या जन्माआधीच त्याची बर्थ डेट समोर आली आहे. 

दीपिका आणि रणवीर आईबाबा होण्यासाठी उत्सुक आहेत. चाहतेही त्यांच्या बाळाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सप्टेंबर महिन्यात दीपिका बाळाला जन्म देणार आहे. दीपिका-रणवीरच्या बाळाची जन्मतारीखही समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये दीपिका तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. दीपिका-रणवीरच्या एका जवळच्या व्यक्तीने याबाबत खुलासा करत त्यांच्या बाळाची जन्मतारीखही सांगितली आहे. 

"दीपिका आणि रणवीर त्यांच्या आयुष्यातील या नवीन प्रवासासाठी उस्तुक आहेत. दीपिका तिचा प्रेग्नंन्सीमधील काळ एन्जॉय करत आहे. जर ठरल्याप्रमाणे गोष्टी झाल्या तर दीपिका २८ सप्टेंबरला बाळाला जन्म देऊ शकते", अशी माहिती जवळच्या व्यक्तीने न्यूज १८ शी बोलताना दिली आहे. दीपिका आणि रणवीरने २०१८ मध्ये लग्न केलं होतं. लग्नानंतर आता ६ वर्षांनी ते आईबाबा होणार आहेत. 

टॅग्स :दीपिका पादुकोणरणवीर सिंगप्रेग्नंसी