Join us

रणवीर-दीपिका मुंबईतील नव्या घरात करणार बाळाचं स्वागत, बांद्रामधील पॉश एरियात 'इतक्या' कोटींना झाली डील

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 11:39 IST

रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोणने दोन वर्षांपूर्वीच बांद्रा येथील एक फ्लॅट बुक केला होता.

अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) सप्टेंबर महिन्यात बाळाला जन्म देणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दीपिकाच्या चेहऱ्यावर प्रेग्नंसी ग्लो दिसून येतोय. तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले ज्यात तिचा बेबी बंप स्पष्ट दिसत होता. तरी अनेकदा दीपिकाला 'फेक बेबी बंप' म्हणत ट्रोलही करण्यात आलं. दीपिका सरोगसीद्वारे आई होणार असल्याची चर्चा झाली. आता पहिल्या बाळाच्या जन्मानंतर रणवीर-दीपिका हे कपल नवीन फ्लॅटमध्ये शिफ्ट होणार आहे. हा फ्लॅट शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याच्या जवळच आहे.

रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि दीपिका पदुकोणने दोन वर्षांपूर्वीच बांद्रा येथील एक फ्लॅट बुक केला होता. तेव्हापासून फ्लॅटचं काम सुरु होतं. आता दीपिका काही दिवसातच आई होणार आहे. पहिल्या बाळाचं स्वागत ते नवीन घरात करतील अशी शक्यता आहे. शाहरुख खानच्या बांद्रा बँडस्टँड येथील 'मन्नत' बंगल्याजवळच एक उंच इमारत उभी राहत आहे. येथील फ्लॅटमधून समोर समुद्राचं विहंगम दृश्य असणार आहे. दोन वर्षांपासून या हाय राइज इमारतीचं काम सुरु आहे. यातील एक फ्लॅट रणवीर आणि दीपिकाने घेतला आहे. दोघांनी यासाठी तब्बल 119 कोटी रुपये मोजले आहेत. शिवाय 7.13 कोटी स्टॅम्प ड्युटीही भरली आहे. 

या फ्लॅटमध्ये अनेक अत्याधुनिक सोयीसुविधा आहेत. १३०० स्क्वेअप फूट आलिशा टेरेस आहे. अपार्टमेंटमध्ये एकूण 11266 स्क्वेअर फूट कार्पेट एरिया आहे.  टेरेस एरिआ, प्रायव्हेट जिम, स्वीमिंग पूल, एंटरटेन्मेंट स्पेसही आहे. 

दीपिकाने फेब्रुवारी महिन्यात इन्स्टाग्राम पोस्ट करत प्रेग्नंसीची न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती. तेव्हापासून अनेकदा तिच्या फेक बेबी बंपचीही चर्चा झाली. आता पुढील महिन्यात ती बाळाला जन्म देणार असून मुलगा की मुलगी या गुडन्यूजची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे,

टॅग्स :दीपिका पादुकोणरणवीर सिंगसुंदर गृहनियोजनमुंबईबॉलिवूड