दीपिका पादुकोण होणार एन्गेज्ड! वाढदिवसाला बॉयफ्रेन्ड रणवीर सिंगसोबत करणार साखरपुडा!!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2018 04:52 AM2018-01-03T04:52:43+5:302018-01-03T10:22:43+5:30
गत वर्षाच्या अखेरिस बॉलिवूडची क्युटीपाय अनुष्का शर्माने विराट कोहलीसोबत लग्नगाठ बांधली. नववर्षातही बॉलिवूडमध्ये वेडिंग सीझन सुरूच राहणार आहे. होय, ...
ग वर्षाच्या अखेरिस बॉलिवूडची क्युटीपाय अनुष्का शर्माने विराट कोहलीसोबत लग्नगाठ बांधली. नववर्षातही बॉलिवूडमध्ये वेडिंग सीझन सुरूच राहणार आहे. होय, नववर्षाच्या प्रारंभी अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग श्रीलंकेत एकमेकांना एन्गेजमेंट रिंग घालू शकतात.
रणवीर व दीपिका या दोघांनी श्रीलंकेत नववर्षाचे स्वागत केले. चर्चा खरी मानाल तर दीपिका आपला वाढदिवसही याचठिकाणी साजरा करण्याच्या मूडमध्ये आहे आणि हा दिवस आणखी यादगार करण्याचाही तिचा इरादा आहे. येत्या ५ जानेवारीला दीपिका आपला ३२ वा वाढदिवस साजरा करणार आहे. याचदिवशी रणवीर व दीपिका दोघेही साखरपुडा करणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे.
एका जाहिरातीच्या शूटसाठी रणवीर श्रीलंकेत गेला होता. यानंतर न्यू ईयर पार्टीसाठी दीपिकाने रणवीरला ज्वॉईन केले. श्रीलंकेत नववर्षाचे स्वागत केल्यानंतर दीपिकाचा वाढदिवसही याचठिकाणी साजरा करण्याचे रणवीरचे प्लानिंग आहे. याच मुहूर्तावर दोघे साखरपुडाही करू शकतात.
रणवीर व दीपिकाचे रिलेशनशिप कुणापासूनही लपलेले नाही. अर्थात या कपलने आपले नाते अधिकृतपणे कधीच स्वीकार केले नाही. पण ते लपलेही नाही. दोघांचेही एकत्र फिरणे, एकत्र इव्हेंटला जाणे, एकमेकांच्या कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होणे यावरून लोकांना कळायचे ते कळलेच. गेल्या काही दिवसांपासून हे कपल लग्न करणार, अशी चर्चा आहे. अलीकडे रणवीर व दीपिकाचे पालक एकमेकांना भेटल्याने या चर्चेला आणखीच उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांत दीपिकाही रणवीरसोबत मोकळेपणाने फिरताना दिसतेय. ताज्या मुलाखतीत, दीपिका रणवीरसोबतच्या नात्यावर बोलली होती. जेव्हा आम्ही सोबत असतो तेव्हा आम्हाला दुसºया कुणाचीच गरज भासत नाही, असे दीपिका म्हणाली होती. यावरून दोघेही एकमेकांसोबत आनंदी आहेत, हे कळते.कदाचित या भावनांना आणि नात्याला एक अधिकृत नाव देण्याची तयारी रणवीर व दीपिका दोघांनीही केली आहे.
ALSO READ : रणवीर सिंगने अशा अनोख्या स्टाईलमध्ये व्यक्त केले दीपिका पादुकोणवरचे प्रेम!
दोघांच्याही प्रोफेशनल फ्रंटबद्दल सांगायचे तर, रणवीर व दीपिका या दोघांचा वादग्रस्त चित्रपट ‘पद्मावती’ पुढील महिन्यात फेब्रुवारीत रिलीज होईल, अशी खबर आहे. याशिवाय रणवीर ‘सिम्बा’मध्ये दिसणार आहे. कपिल देवचे बायोपिकही त्याने साईन केले आहे.