Join us

"भारतीय सिनेमांना अनेकदा डावलण्यात आलंय"; दीपिका पादुकोणचा 'ऑस्कर'वर राग; म्हणाली-

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 13:34 IST

'लापता लेडीज'ची यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात निवड न झाल्याने दीपिका पादुकोणने व्हिडीओच्या माध्यमातून राग व्यक्त केलाय (deepika padukone)

काहीच दिवसांपूर्वी ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. यंदाच्या ऑस्कर पुरस्कार पुरस्कार सोहळ्यात भारतीयांची मात्र चांगलीच निराशा झाली. कारण प्रियंका चोप्रा (priyanka chopra) निर्मित 'अनुजा' ही शॉर्ट फिल्म सोडली तर ऑस्करसाठी एकही प्रोजेक्ट नव्हता. किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' (laapta ladies) सिनेमाचीही निवड करण्यात आली नाही. अशातच अभिनेत्री दीपिका पादुकोणने (deepika padukone) ऑस्करविषयी तिची नाराजी व्यक्त केली आहे. ऑस्करमध्ये (oscar) भारताला कायम वंचित ठेवलं जातं, अशी तक्रार दीपिकाने सर्वांसमोर मांडली आहे. काय म्हणाली दीपिका जाणून घ्यादीपिकाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत दीपिकाने ऑस्कर २०२३ च्या आठवणी जागवल्या. त्यावेळी RRR सिनेमातील 'नाटू नाटू' गाण्याला ऑस्कर मिळाला होता. याशिवाय २०२३ मधील ऑस्कर सोहळ्यात दीपिकाने प्रेझेंटर म्हणून जबाबदारी निभावली होती. व्हिडीओमध्येच दीपिकाने भारताचा 'लापता लेडीज' ऑस्करमध्ये निवडला गेला नाही, म्हणून नाराजी व्यक्त केली. दीपिका म्हणाली की, "भारताला अनेकदा ऑस्करपासून दूर ठेवण्यात आलंय. याआधीही अनेक सिनेमांना ऑस्करमध्ये डावलण्यात आलंय.""अनेक चांगले सिनेमे आणि टॅलेंटला ऑस्करने दुर्लक्षित केलंय. भारतासोबत अनेकदा ऑस्करमध्ये अन्याय झाला आहे. मला आठवतंय २०२३ च्या ऑस्कर सोहळ्यात मी प्रेक्षकांमध्ये होते आणि RRR चं नाव ऑस्करसाठी पुकारण्यात आलं तेव्हा मी भावुक झाले होते. माझा RRR मध्ये प्रत्यक्ष असा काही सहभाग नव्हता पण मी भारतीय होते. त्यामुळे माझ्यासाठी तो एक मोठा क्षण होता. RRR ने ऑस्कर जिंकणं ही खूप वैयक्तिक आणि आनंदाची भावना होती. "

टॅग्स :दीपिका पादुकोणबॉलिवूडऑस्करऑस्कर नामांकनेआरआरआर सिनेमा