दीपिका पादुकोण (Deepika Padukone) लवकरच अनेक मोठ्या सिनेमांत झळकणार आहे. हृतिक रोशनसोबत ‘फाइटर’ मध्ये तिची वर्णी लागली आहे. शाहरूख खानसोबत ‘पठाण’मध्येही ती दिसणार आहे. पण तूर्तास चर्चा दीपिकाच्या सिनेमांची नाही तर तिच्या कपड्यांची आहे. होय, दीपिकाने तिचे काही जुने कपडे लिलावात काढले आहेत आणि यावरूनच दीपिका ट्रोल होतेय.या कपड्यांच्या लिलावातून मिळणारी रक्कम दीपिका Live Love Laugh Foundtaion ला दान करणार आहे. म्हणजे काम तसे ‘नेक’ आहे. पण मग ट्रोल कशावरून तर, दीपिकाने लिलावात काढलेले कपडे तिने वेगवेगळ्या अंत्यसंस्काराप्रसंगी घातल्याचा युजर्सचा दावा आहे. यामुळेच ती युजर्सच्या निशाण्यावर आली आहे.
एका युजरने केलेल्या दाव्यानुसार, दीपिकाने जे कपडे लिलावात काढले आहेत, ते तिने अभिनेत्री जिया खान व प्रियंका चोप्राचे वडील अशोक चोप्रा यांच्या अंत्यसंस्कारावेळी घातले होते. शरण्या शेट्टी असे दावा करणा-या युजरचे नाव आहे. ‘मी हैराण आहे... माझी आवडती अभिनेत्री दीपिका पादुकोणने 2013 मध्ये घातलेले कपडे लिलावात काढले आहेत. हे कपडे डिझाईनर नाहीत. 2013 साली दोन वेगवेगळ्या अंत्यसंस्कारावेळी तिने हे कपडे घातले होते,’ असे ट्वीट या युजरने केले आहे.
हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतेय आणि यामुळेच अनेकांनी दीपिकाला ट्रोल केले आहे. अनेकांनी दीपिकाबद्दल संताप व्यक्त केला आहे. 14-15 वर्षांपूर्वीचे कपडे-जोड्यांचा लिलाव करून काय अर्थ? त्यापेक्षा एखाद्या गरजूला द्यायचे ना? अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत. अर्थात काहींनी तिचा सपोर्टही केला आहे. हा लिलाव चॅरिटीसाठी आहे. तेव्हा कृपा करून तिला जज करू नका, असे लिहित एका युजरने दीपिकाला पाठींबा दिला आहे.