Join us  

सिध्दार्थ चतुर्वेदीसोबतचा दीपिकाचा लिपलॉक सीन व्हायरल, लग्नानंतर पहिल्यांदाच दिसली Bold अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 2:19 PM

दीपिका पादुकोण (Deepika Padukone) लग्नानंतर पहिल्यांदाच इतक्या बोल्ड अंदाजात दिसते आहे.

अभिनेत्री दीपिका पादुकोण  (Deepika Padukone) च्या पुढील चित्रपटाचे नाव आणि पहिली झलक समोर आली आहे. या चित्रपटाचे नाव गेहराईया (Gehraiyaan)  असे असेल. या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून दीपिका पदुकोण लग्नानंतर पहिल्यांदाच इतक्या बोल्ड अंदाजात दिसते आहे.

 गेहराईया(Gehraiyaan) मध्ये दीपिका पादुकोण(Deepika Padukone)सोबत सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) आणि अनन्या पांडे (Ananya Panday) सोबत दिसणार आहे. दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi)  यांची धमाकेदार केमिस्ट्री गेहराईयाच्या टीझरमध्ये आहे.

गेहराईयाच्या टीझर (Gehraiyaan Teaser) मध्ये दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी(Deepika Padukone Siddhant Chaturvedi Lip Lock)  एकमेकांसोबत लीपलॉक करताना दिसतेय. दोघांमधल्या रोमान्सची टीझर आऊट झाल्यापासून चांगलीच चर्चा आहे. 

यात नसीरुद्दीन शाह आणि रजत कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने सहनिर्मित केला आहे. ही दोन जोडप्यांची कथा आहे जी ते त्यांच्या गुंतागुंतीच्या नात्याला कसे सामोरे जातात हे दर्शविते.

या चित्रपटाचे दिग्दर्शन शकुन बत्रा करत आहेत. हा चित्रपट 25 जानेवारी 2022 रोजी OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर प्रदर्शित होणार आहे.2020 मध्ये कोरोनाच्या दरम्यान  गोवा, मुंबई आणि अलिबागमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते.

टॅग्स :दीपिका पादुकोणरणवीर सिंगसिद्धांत चतुर्वेदीअनन्या पांडे