Join us

बर्थ डे गर्ल दीपिकाला चाहत्याने विमानतळावर दिले सरप्राईज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 15:35 IST

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण हिचा आज वाढदिवस. आज दीपिका तिचा 34 वा वाढदिवस साजरा करतेय.

ठळक मुद्देसध्या दीपिका छपाक या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण हिचा आज वाढदिवस. आज दीपिका तिचा 34 वा वाढदिवस साजरा करतेय. दीपिका सध्या ‘छपाक’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. पण बिझी शेड्यूल बाजूला ठेवून दीपिका पती रणवीर सिंगसोबत बर्थ डे सेलिब्रेट करतेय. बर्थ डे सेलिब्रेशनसाठी दीपिका आज सकाळी रणवीरसोबत लखनौला रवाना झाली. पण त्याआधी एका चाहत्याने दीपिकाला एक खास सरप्राईज दिले.

दोघांनाही एअरपोर्टवर स्पॉट केले गेले. यावेळी दीपिका व रणवीर दोघेही एकदम कूल हटके लूकमध्ये दिसले. यावेळी दीपिकाने ओवरसाईज शर्ट आणि ब्ल्यू डेनिम आणि वर ऑरेंज कलरचा कोट घातला होता. दीपिका व रणवीर एअरपोर्टवरून निघत असताना एक चाहता दीपिकासाठी केक घेऊन आला. दीपिकाने मोठ्या आनंदाने केक कापला. शिवाय रणवीरलाही भरवला. त्याठिकाणी उपस्थित फोटोग्राफर्सनी हा क्षण कॅमे-यात कैद केला.

सध्या दीपिका छपाक या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.  ‘छपाक’बद्दल सांगायचे झाल्यास, या चित्रपटात दीपिका अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी अग्रवालची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे.

नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. या ट्रेलरनंतर लोकांनी दीपिकाच्या कामाचे कौतुक केले. या चित्रपटात दीपिकाशिवाय या चित्रपटात विक्रांत मेस्सी प्रमुख भुमिकेत आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 10 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितेची व्यक्तिरेखा साकरण्यासाठी दीपिकाने प्रोस्थेटिक्स मेकअपची मदत घेतली होती. याशिवाय ‘83’ या सिनेमातही दीपिका दिसणार आहे. यात ती पती रणवीर सिंगसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. 

टॅग्स :दीपिका पादुकोण