अभिनेता अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ आणि दीपिका पादुकोणचा ‘छपाक’ रिलीज होऊन दहा दिवस झालेत. या दहा दिवसांत दीपिकाच्या ‘छपाक’ला धोबीपछाड देत, अजयच्या ‘तान्हाजी’ने बराच मोठा पल्ला गाठल्याचे दिसतेय. 200 कोटी क्लबकडे ‘तान्हाजी’ची वाटचाल सुरु आहे. पहिल्या सहा दिवसांतच ‘तान्हाजी’ने 100 कोटींचा गल्ला जमवला. अद्यापही या चित्रपटाची घोडदौड अद्यापही सुरुच आहे. या चित्रपटाच्या कमाईचे आकडे पाहिल्यानंतर त्याच्या स्पर्धेत अन्य कोणताही चित्रपट नसल्याचे दिसून येत आहे. नवव्या दिवशी या चित्रपटाने 16.36 कोटी रुपयांची कमाई केली तर दहाव्या दिवशी 22.12 कोटींचा बिझनेस केला. आत्तापर्यंत आतापर्यंत या चित्रपटाची एकूण कमाई 167.45 कोटी रुपये झाली आहे. कमाईचा वेग असाच राहिला तर हा चित्रपट लवकरच 200 कोटींचा टप्पा पार करेल असे दिसतेय.
Tanhaji Movie : 10 व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर ‘तान्हाजी’चे धुमशान, कमावले इतके कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 11:52 IST
Tanhaji Movie Box Office Collection Day 10 : दहा दिवसांत दीपिकाच्या ‘छपाक’ला धोबीपछाड देत, अजयच्या ‘तान्हाजी’ने बराच मोठा पल्ला गाठल्याचे दिसतेय.
Tanhaji Movie : 10 व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर ‘तान्हाजी’चे धुमशान, कमावले इतके कोटी
ठळक मुद्दे‘तान्हाजी’मध्ये अजय देवगण मुख्य भूमिकेत झळकला असून काजोलने तान्हाजी मालुसरे यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.