डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी दीपिका पादुकोण करायची 'हे' काम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2018 7:08 AM
सध्या दीपिका पादुकोणचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. पद्मावतच्या यशाचा आनंद सध्या ती अनुभवते आहे. पद्मावतमध्ये ती साकारलेल्या भूमिकेच ...
सध्या दीपिका पादुकोणचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. पद्मावतच्या यशाचा आनंद सध्या ती अनुभवते आहे. पद्मावतमध्ये ती साकारलेल्या भूमिकेच भरुभरुन कौतुक करण्यात आले आहे. दीपिकाचा एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरच्या आई- वडिलांनी देखील दीपिकाच्या कामाची स्तुती केली. चित्रपटाच्या स्क्रिनिंगला दीपिका रणवीर सिंगच्या हातात हात घालून आली होती. एका इंटरव्ह्रु दरम्यान तिने आपल्या आयुष्यातील दिवसांचा खुलासा केला होता. रणवीर सिंगच्या आधी दीपिका रणबीर कपूरसोबत रिलेशनशीपमध्ये होती. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांचे रस्ते वेगळे झाले. या ब्रेकअपमुळे दीपिका डिप्रेशनमध्ये गेली होती एक इंटरव्हु दरम्यान ती म्हणाली यातून बाहेर पडण्यासाठी तिला अनेक प्रयत्न करावे लागले. रणबीरच्या आयुष्यात कॅटरिना कैफची एंट्र झाली आणि तो दीपिकापासून दूर झाला. दीपिका आणि रणबीर कपूरने बचना ऐ हसीनों, तमाशा आणि ये जवानी है दीवानी सारख्या अनेक चित्रपटात एकत्र काम केले होते. ब्रेकअपनंतर ही अनेक वेळा दोघे एकमेकांनासोबत वेळ घालवताना दिसतात. दीपिका म्हणते, रणबीरला विसरणं तिच्यासाठी सोप नव्हते. ती या रिलेशनशिपला घेऊन खूपच सिरिअस होती. ब्रेकअपनंतर मला आयुष्य विस्कटल्यासारखं वाटत होते. या ब्रेकअपनंतर काही काळ ती डिप्रेशनमध्ये गेली होती. या इंटरव्ह्रु दरम्यान दीपिकाला यातून बाहेर पडण्यासाठी काय केलेस असे विचारण्यात आले. यावर ती म्हणाली मी पटकन कोणामध्ये मिसळत नाही. मी खूपवेळ फक्त लोकांना बघत राहते. ब्रेकअपनंतर मी स्वत:ला एकाकीपणापासून वाचवण्यासाठी सतत कामात बिझी असायचे. मी स्वत:ला कामात पूर्णपणे झोकून दिले होते. पुढे ती म्हणाली की,'' आता मात्र रणबीर माझा चांगला मित्र झाल्याने मी त्याच्यासोबत काम करु शकते.'' ALSO READ : दीपिका पादुकोणचा खुलासा; ‘या’ अभिनेत्रीला आपल्या लग्नात बोलाविणार नसल्याचे केले स्पष्ट’!काही वर्षांपासून दिपिका आणि रणवीर सिंग रिलेशनशिपमध्ये आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या चर्चेला उधाण आले आहे. मात्र या दोघांनी अधिकृतरित्या याबाबत काहीही सांगितलेले नाही. मध्यंतरी हे कपल साखरपुडा करणार अशीही खबर आली. पण साखरपुड्याची बातमीही खोटी ठरली. पण कदाचित आता योग्य वेळ आली आहे. होय, दीपिका व रणवीरच्या अतिशय जवळच्या सूत्रांनी दिलेली माहिती खरी मानाल तर या कपलने आपले नाते जगासमोर मान्य करण्याचा निर्णय घेतला आहे.