Deepika Padukone:बॉलिवूड स्टार शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) सध्या त्यांच्या आगामी 'पठाण' चित्रपटामुळे चर्चेत आहेत. त्यांच्या चित्रपटातील 'बेशरम रंग' गाण्यावरून बराच गदारोळ सुरू आहे. आमिर खानच्या 'लाल सिंह चढ्ढा' या चित्रपटानंतर शाहरुख खानच्या विरोधात 'बॉयकॉट गँग' सक्रिय झाली आहे. #boycottpathaan हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. दरम्यान, दीपिका पादुकोणविरोधातील एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिच्या धर्मावर प्रश्न उपस्थित केला जात आहेत.
'पठाण' गाण्यावरून गदारोळपठाणच्या पहिल्या गाण्यात दीपिका खूपच बोल्ड लूकमध्ये दिसली होती. गाण्याच्या एका दृश्यात दीपिकाने भगव्या रंगाची मोनोकिनी घातली होती, ज्यावर काही राजकारण्यांनी आक्षेप घेतला आहे. यादरम्यान, पाटणा विद्यापीठात शिकलेल्या एका निवृत्त व्यक्तीचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो दीपिका पादुकोणच्या धर्मावर प्रश्न उपस्थित करतोय.
चित्रपट निर्माते विनोद कापरी यांनी हा व्हिडिओ शेअर केला चित्रपट निर्माते विनोद कापरी यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना, कापरीने कॅप्शन दिले, "#DeepikaPadukone बद्दल नवीन खुलासे असलेला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पाटणा विद्यापीठ तात्काळ बंद केले जावे 😊"
दीपिका पदुकोण एक मुस्लिम महिला आहेव्हिडीओतील व्यक्तीची ओळख पटलेली नाही, पण तो दीपिका पादुकोणला मुस्लिम महिला म्हणत आहे. यावर रिपोर्टर त्या व्यक्तीला दीपिका पादुकोणचे वडील प्रकाश पादुकोण यांच्याबद्दल विचारतो, त्यावर तो व्यक्ती त्यांनाही मुसलमान म्हणतो. यावेळी व्हिडिओमध्ये रिपोर्टरसह इतर लोक हसायला लागतात.