Join us

 लोक आत्महत्या करत नाही तर ते आत्महत्येने मरतात... ! दीपिकाने लिहिली माध्यमांसाठी पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 12:44 PM

सुशांतच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री दीपिका पादुकोणची पोस्ट...

ठळक मुद्देरविवारी दुपारी सुशांत सिंग राजपूतने मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. 

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंगच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला आहे. सुशांत गेल्या काही महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये होता आणि याचमुळे त्याने आत्महत्या केल्याचे मानले जात आहे. त्याच्या आत्महत्येने बॉलिवूडलाही हादरा बसला आहे. अनेकांनी त्यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण हिनेही सुशांतच्या आत्महत्येनंतर एक  पोस्ट लिहित डिप्रेशनवर स्वत:चे मत व्यक्त केले आहे. याचे कारण म्हणजे दीपिका ही सुद्धा कधीकाळी डिप्रेशनमधून गेलीय. डिप्रेशन काय असते, हे तिला ठाऊक आहे.

‘एक व्यक्ति म्हणून मी सुद्धा डिप्रेशनचा अनुभव घेतला आहे. या अनुभवातून मी केवळ इतकेच सांगेन की, मदतीसाठी समोर येणे आणि संवाद याचद्वारे डिप्रेशनवर मात करता येते.  डिप्रेशनमध्ये असाल तर व्यक्त व्हा, बोला, मदत मागा, संवाद साधा़ तुम्ही एकटे आहात असे अजिबात समजू नका. आपण सर्वजण या प्रवासात एकमेकांसोबत आहोत आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे उमेद आहे’, असे तिने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

मीडियासाठीही दीपिकाने एक पोस्ट लिहिली आहे. ‘मीडियातील माझ्या मित्र मैत्रिणींनो, गुन्हेगार गुन्हा करतात़  लोक आत्महत्या करत नाही तर ते आत्महत्येने मरतात. अत्यंत गंभीर क्लेशातून ही कृती घडते,’ असे लोकांना व मीडियाला उद्देशून तिने लिहिले आहे.सुशात सिंगच्या ‘राब्ता’ या सिनेमात दीपिकावर एक गाणे चित्रीत करण्यात आले होते. सुशांत व दीपिकाची चांगली मैत्री होती.

रविवारी दुपारी सुशांत सिंग राजपूतने मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. 

टॅग्स :दीपिका पादुकोणसुशांत सिंग रजपूत