Gehraiyaan Title Track : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या (Deepika Padukon) ‘गहराइयां’ (Gehraiyaan) या सिनेमाचं टायटल साँग रिलीज झालंय आणि रिलीज होताच या गाण्यानं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. तू मर्ज हैं दवा भी, पर आदत है हमें, रोका हैं खुद को लेकिन हम रह ना सके..., असे बोल असलेलं हे गाणं यूट्यूबवर प्रचंड पाहिलं जातंय. या टायटल साँगमध्ये सर्व कलाकारांची लव्ह केमिस्ट्री बघण्यासारखी आहेच. पण त्यापेक्षा दीपिकाचा अभिनय बघण्यासारखा आहे. या गाण्यातील दीपिकाचा अभिनय बघून फॅन्स क्रेझी झाले आहेत.
या गाण्याला दीड तासात दीड मिलियनहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. गीतकार अंकुर तिवारी यांनी लिहिलेलं हे गाणं सिांर लोथिकाने गायलं आहे. गेल्या काही दिवसांपासून दीपिकाच्या या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. या सिनेमात दीपिकाने सिद्धांत चतुर्वेदीसोबत अनेक बोल्ड इंटिमेट सीन्स दिले आहेत. दीपिकाचा ओटीटीवरचा पहिला सिनेमा आहे. चित्रपटात दीपिका पदुकोण, अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. तर रजत कपूर, नसीरुद्दीन शाह यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटात नात्यांची गुंतागुंत दाखवण्यात आली आहे. दोघी बहिणी आणि त्यांचं एकमेकींच्या भोवती फिरणारं ‘लव्ह लाईफ’ अशी या सिनेमाची कथा आहे. येत्या 11 फेब्रुवारीला प्रदर्शित होतोय. अॅमेझॉन प्राईमवर हा सिनेमा रिलीज होतोय.