Join us

Deepika Padukone : दीपिका पादुकोणची तब्येत अचानक बिघडली; रुग्णालयात केलं तातडीने दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 19:24 IST

Deepika Padukone : जवळपास 12 तास रुग्णालयात असलेल्या दीपिकाच्या अनेक चाचण्या करण्यात आल्या.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणची (Deepika Padukone) तब्येत अचानक बिघडली असून सोमवारी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अस्वस्थ वाटू लागल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. दीपिकासोबत यापूर्वीही असंच घडलं आहे आणि त्यामुळे चाहत्यांना आता तिच्या तब्येतीची खूप चिंता वाटू लागली आहे. 

दीपिका पादुकोण 26 सप्टेंबर 2022 च्या रात्री अचानक आजारी पडली आणि अस्वस्थ वाटू लागल्यामुळे तिला ताबडतोब रुग्णालयात दाखल करावे लागले. रिपोर्ट्सनुसार, दीपिकाची प्रकृती आता बरी आहे. जवळपास 12 तास रुग्णालयात असलेल्या दीपिकाच्या अनेक चाचण्या करण्यात आल्या. दीपिकाच्या टीमकडून याविषयी कोणतीही माहिती आलेली नाही. पण पिंकविलाच्या म्हणण्यानुसार, दीपिकाची प्रकृती आता स्थिर आहे आणि तिच्या तब्येतीत खूप सुधारणा होत आहे. 

दीपिकाला अचानक रुग्णालयात नेण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही महिन्यांपूर्वीही हार्ट रेट वाढल्यामुळे तिला हैदराबादमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी दीपिका प्रभाससोबत तिथे एका प्रोजेक्टसाठी शूटिंग करत होती. त्यानंतरही दीपिकाला अर्धा दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :दीपिका पादुकोणबॉलिवूड