Join us

दीपिका पदुकोण रुग्णालयात दाखल, कोणत्याही क्षणी गुडन्यूज मिळणार; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 17:22 IST

कालच दीपिका आणि रणवीरने सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं होतं.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) लवकरच गुडन्यूज देणार आहे. दीपिका आणि रणवीर आईबाबा होणार आहेत. नुकतंच दीपिका रुग्णालयात दाखल झाली आहे. त्यामुळे येत्या काही तासात ती बाळाला जन्म देईल. कालच दीपिका आणि रणवीरने कुटुंबासह सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. तर आज 'मॉम टू बी' रुग्णालयात पोहोचली आहे. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

दीपिका पदुकोण मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात दाखल झाली आहे. तिची कार रिलायन्समध्ये जातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दीपिकासोबत रणवीर आणि त्यांचं कुटुंब आहे. कोणत्याही क्षणी दीपिका बाळाला जन्म देईल. तिच्या गुडन्यूजकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. बेबी पदुकोण सिंह नक्की कोण असणार याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. काल दीपिका आणि रणवीरने बाप्पाचा आशीर्वाद घेतला होता. हिरव्या बनारसी साडीत ती सुंदर दिसत होती. दीपिकाच्या चेहऱ्यावर प्रेग्नंसी ग्लो स्पष्ट दिसत होता. आता नऊ महिन्यांनंतर सर्वांनाच बेबी पदुकोणची झलक पाहायला मिळणार आहे.

दोन दिवसांपूर्वीच दीपिकाने मॅटर्निटी फोटोशूट केलं होतं. यामध्ये बेबी बंप फ्लॉन्ट करत तिने हे शूट केलं. रणवीर सिंहही या फोटोशूटमध्ये रोमँटिक अंदाजात दिसला. दोघंही आई बाबा होणार असल्याने त्यांच्या घरात आनंदाचं वातावरण आहे. काही तासातच ही गुडन्यूज मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान दीपिका सप्टेंबर अखेरीस बाळाला जन्म देणार अशीही एक चर्चा रंगली होती. मात्र आता ती हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याने ती अफवा असल्याचंच स्पष्ट होत आहे.

टॅग्स :दीपिका पादुकोणरणवीर सिंगबॉलिवूडहॉस्पिटलप्रेग्नंसी