बॉलिवूडमधलं सर्वात चर्चेतलं कपल रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांनी काल एका इव्हेंटमध्ये हजेरी लावली. यावेळी त्यांच्यातील दुरावा स्पष्ट दिसत होता. दोघांमध्ये आलबेल नसल्याचीच चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. गाडीतून उतरल्यावर रणवीर दीपिकाचा हात पकडणार तोच दीपिका त्याच्या हातात हात न देताच पुढे चालायला लागली. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.
दीपिकाने रणवीरला केलं थेट इग्नोर
काल इंडियन स्पोर्ट्स ऑनर्स २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रणवीर सिंग आणि दीपिका दोघांनी प्रकाश पदुकोण यांच्यासोबत हजेरी लावली. यावेळी रेड कार्पेटवर दीपिकाने रणवीरला इग्नोर केल्याचं पाहायला मिळालं. एवढंच नाही तर गाडीतून उतरताना रणवीर दीपिकाचा हात पकडायला जातो मात्र दीपिका रणवीरकडे बघतही नाही. दोघांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
दोघांमधील हा दुरावा नेटकऱ्यांच्याही नजरेस पडला. 'दोघांची बॉडी लँग्वेज पूर्णपणे बदलली आहे', 'दोघांचं भांडण झालं आहे', 'दीपिका रागात आहे. दोघांमधील रोमान्स लवकरच संपेल' अशा कमेंट्स युझर्सने केल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून या पॉवर कपलमध्ये बिनसल्याची चर्चा जोर धरुन होती. दीपिकाच्या वाढदिवशी रणवीरने कोणतीच पोस्ट केली नाही. इतकंच नाही तर दीपिका ऑस्कर्समध्ये प्रेंझेंटर म्हणून सहभागी झाली तेव्हा सर्वांनी तिचं कौतुक केलं. मात्र रणवीरची त्याच्या लेडी लव्हसाठी एकही पोस्ट दिसली नाही. अशा अनेक प्रसंगांमुळे दोघांमध्ये बिनसलं असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.