बॉलिवूडची ‘मस्तानी’ दीपिका पादुकोण हिच्या मनात नेमके चाललेय तरी काय? जुन्या सगळ्या आठवणी तिला पुसून काढायच्या आहेत की हा प्रमोशनचा फंडा आहे? कळायला मार्ग नाही. आता तुम्ही म्हणाल, असे काय झाले तर दीपिका पादुकोणचे इन्स्टाग्राम अकाऊंट, ट्विटर इतकेच नाही तर फेसबुक पूर्णपणे खाली आहे. होय, या अकाऊंटवरच्या सगळ्या पोस्ट डिलीट झल्या आहेत. होय, त्यावर एकही पोस्ट नाही. दीपिकाचे सोशल अकाऊंट अचानक अशापद्धतीने खाली झालेले पाहूनच साहजिकच तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
काय आहे कारण?दीपिकाचे सोशल अकाऊंट हॅक झाले की काही तांत्रिक कारणाने असे झालेय? असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. अर्थात काहींना प्रमोशनचा फंडा वाटत आहे. तर अनेकांना दीपिकाने जाणीवपूर्वक नवीन वर्षात सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला असावा,असे वाटतेय. पण दीपिकाने याआधी कधीही असे केलेले नाही. सोशल मीडियावर ती कमालीची अॅक्टिव्ह आहे. स्वत:चे पर्सनल फोटो, प्रोजेक्टबद्दलची माहिती असे सगळे ती शेअर करत असते. गेले वर्ष दीपिकासाठी काहीसे चढऊताराचे राहिले, हे मात्र खरे. ड्रग केसमध्ये नाव आल्यानंतर तिला एनसीबी चौकशीलाही सामोरे जावे लागले. पण यानंतर दीपिका तिच्या सगळे विसरून तिच्या आगामी सिनेमांचे शूटींग सुरू केले आहे.