Join us

...अन् भर कार्यक्रमात दीपिकाने शाहरुखला केलं किस; 'जवान'च्या सक्सेस पार्टीतील 'तो' व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 14:20 IST

‘जवान’ चित्रपटाच्या सक्सेस पार्टीतील शाहरुख आणि दीपिकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अ‍ॅटली कुमार दिग्दर्शित ‘जवान’ हा बॉलिवूड चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. शाहरुख खानच्या या चित्रपटाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. ‘पठाण’नंतर शाहरुखच्या या चित्रपटाबाबत प्रेक्षकांना उत्सुकता होती. ‘जवान’ चित्रपटात शाहरुखबरोबर दीपिका पदुकोणही झळकली आहे. या चित्रपटात दीपिकाने कैमिओ केला आहे. पण छोटीशी भूमिका असूनही दीपिकाने छाप पाडली आहे. नुकतंच ‘जवान’ चित्रपटाच्या सक्सेस पार्टी पार पाडली. या पार्टीतील शाहरुख आणि दीपिकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘जवान’मधील कलाकारांनी या सक्सेस पार्टीला हजेरी लावली होती. शाहरुखने या पार्टीसाठी खास लूक केला होता. तर दीपिकाने या पार्टीला साडी नेसून हजेरी लावली होती. या पार्टीतील एक व्हिडिओ वुम्पला या पापाराझी पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत दीपिका स्टेजवरच शाहरुखला गालावर किस करताना दिसत आहे. जवानच्या सक्सेस पार्टीतील हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत.

"जाडेपणामुळे अनेक चांगल्या भूमिका गेल्या", विशाखा सुभेदारने व्यक्त केली खंत, म्हणाली, "सई, अमृता..."

भगव्या कपड्यांत मॅटर्निटी फोटोशूट करणं महागात पडलं, स्वरा भास्कर ट्रोल, नेटकरी म्हणाले,"बुरखा कुठे..."

दरम्यान, शाहरुख आणि दीपिकाने अनेक चित्रपटांत एकत्र काम केलं आहे. दीपिकाने तिच्या पहिल्याच ‘ओम शांती ओम’ या चित्रपटात शाहरुखच्या हिरोईनची भूमिका साकारली होती. त्यानंतर ‘चेन्नई एक्सप्रेस’, ‘हॅपी न्यू इयर’ या चित्रपटांत ते एकत्र दिसले. ‘जवान’ आधी ‘पठाण’ चित्रपटात शाहरुख आणि दीपिका यांनी स्क्रीन शेअर केली होती. दीपिका आणि शाहरुख एकमेकांचे चांगले मित्र आहेत. शाहरुखचा चित्रपट म्हणून ‘जवान’साठी दीपिकाने फी घेतली नसल्याचं तिने सांगितलं होतं.

टॅग्स :जवान चित्रपटदीपिका पादुकोणशाहरुख खानसेलिब्रिटी