दीपिका पादुकोणने विशाल भारद्वाज यांचा चित्रपट साईन केला, अशी बातमी दोन -तीन महिन्यांपूर्वी चर्चेत होती. ‘सपना दीदी’ नामक या चित्रपटात दीपिकासोबत इरफान खान दिसणार होता. या चित्रपटाचे शूटींग सुरू होणार, नेमके त्याचवेळी इरफानच्या आजाराबद्दल माहित झाले आणि हा चित्रपट रखडला. पुढे इरफानला कॅन्सर झाल्याचे निदान झाले आणि हा चित्रपट थंडबस्त्यात पडला. आता या चित्रपटाबद्दल एक महत्त्वपूर्ण बातमी आहे. होय, दीपिकाने हा चित्रपट सोडल्याचे कळते. डीएनएने दिलेले वृत्त खरे मानाल तर दीपिकाने या चित्रपटाचे साईनिंग अमाऊंट विशाल भारद्वाज यांना परत केले आहे. तथापि इरफानची तब्येत चांगली झाल्यावर आपण हा चित्रपट करू, असे तिने विशाल भारद्वाज यांना सांगितल्याचे कळतेय. येत्या नोव्हेंबरमध्ये दीपिका बॉयफ्रेन्ड रणवीर सिंगसोबत लग्न करणार आहे. कदाचित यामुळे तिने हा चित्रपट सोडल्याचे मानले जात आहे.नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत दीपिकाने आपण सध्या ब्रेकवर असल्याचे सांगितले आहे. मी सध्या ब्रेकअप आहे. मी कुठलाही चित्रपट साईन केलेला नाही. पण अनेक दिग्दर्शकांशी माझी चर्चा सुरू आहे, असे दीपिकाने यावेळी सांगितले.
विन डिजलच्या ‘एक्सएक्सएक्स- रिटर्न आॅफ जेंडर केज’ या हॉलिवूडपटातून दीपिकाने हॉलिवूड डेब्यू केला होता. या चित्रपटाला म्हणावे तसे यश मिळाले नाही. पण यातून दीपिकाने केलेला डेब्यू मात्र चांगलाच यशस्वी ठरला होता. या चित्रपटाने हॉलिवूडमध्ये तिला वेगळी ओळख निर्माण करता आली. हॉलिवूड स्टार विन डिजल तर जणू दीपिकाच्या अभिनयाच्या प्रेमातच पडला. याच प्रेमापोटी ‘एक्सएक्सएक्स- रिटर्न आॅफ जेंडर केज’ पुढील भागातही दीपिकाची वर्णी लागणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक डीजे यांनी ट्विटरवर याबाबचे संकेत दिले आहे. ‘एक्सएक्सएक्स- रिटर्न आॅफ जेंडर केज’च्या पुढील सीरिजमध्ये दीपिका पादुकोण नक्कीचं असेल,असे त्यांनी एका कमेंटला उत्तर देताना स्पष्ट केले आहे.