दीप-वीरच्या लग्नाची तयारी सुरु! दीपिका पादुकोणची आई घालणार ‘नंदी’ पूजा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 08:55 PM2018-08-23T20:55:01+5:302018-08-23T20:58:38+5:30

रणवीर व दीपिका येत्या 20 नोव्हेंबरला लग्न करणार, असा दावा अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे आणि कदाचित या दाव्यात तथ्यही आहे.

deepika padukone mom arranges grand pre-wedding pooja and invites ranveer family | दीप-वीरच्या लग्नाची तयारी सुरु! दीपिका पादुकोणची आई घालणार ‘नंदी’ पूजा!

दीप-वीरच्या लग्नाची तयारी सुरु! दीपिका पादुकोणची आई घालणार ‘नंदी’ पूजा!

प्रियांका चोप्रा अणि निक जोनासच्या लग्नाच्या चर्चेसोबतचं दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाची चर्चाही जोरात आहे. पण अद्यापही दोघांच्या लग्नाबद्दलचा सस्पेन्स कायम आहे. रणवीर व दीपिका येत्या 20 नोव्हेंबरला लग्न करणार, असा दावा अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे आणि कदाचित या दाव्यात तथ्यही आहे. होय, स्पॉटब्वॉयने दिलेल्या वृत्तानुसार, लग्नापूर्वी दीपिकाच्या आईने घरी एक पूजा ठेवली आहे. या पूजेला रणवीर व रणवीरचे अख्खे कुटुंब हजर असेल. या पूजेसाठी रणवीर आपल्या कुटुंबासोबत दीपिकाच्या बेंगळुरू येथील घरी जाईल. या पुजेसाठी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातील शुभमुहूर्त निवडण्यात आल्याचे कळते़. या पुजेसोबतचं दीपिका व रणवीरच्या लग्नाचे पारंपरिक विधी सुरू होतील.

 दीपिकाच्या घरी होणाऱ्या या पूजेला ‘नंदी पूजा’ म्हटले जाते. बेंगळुरूमधील सुप्रसिद्ध नंदी मंदिरातील ब्राह्मणांच्या हस्ते ही पूजा केली जाईल. या पूजेत भावी वधूला काचेचा चुडा चढवला जातो. त्यानुसार, दीपिकालाही काचेचा चुडा चढवला जाईल. लग्न होईपर्यंत वधूने हा काचेचा चुहा हातातून काढायचा नसतो. एकंदर काय तर, या पूजेसाठी निवडलेले नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्याचे मुहूर्त बघता, दीप-वीर 20 नोव्हेंबरलाच लग्नगाठ बांधणार, असे मानले जात आहे.

रिपोर्टनुसार दोघांचे लग्न याचवर्षी 20 नोव्हेंबरला इटलीमध्ये होऊ शकते. लग्नासाठी या कपलने इटलीच्या लेक कोमो, लोम्बार्डी नावाचे ठिकाण सिलेक्ट केले आहे. बीच हॉलिडेसाठी याला बेस्ट डेस्टिनेशन म्हटले जाते. लेक कोमो हे इटली येथील तिसरा सर्वात मोठा तलाव आहे. हा तलाव 1300 फूट खोल आणि 146 स्क्वेअर किलोमीटर लांब आहे.रिपोर्टनुसार, दोघांचे लग्न दाक्षिणात्य पद्धतीने होणार आहे. पहिले दोघांच्या लग्नाची तारीख 10 नोब्हेंबर ठरवण्यात आली होती.  यानंतर 20 नोव्हेंबर ही तारीख ठरवण्यात आली.  दीपिका सध्या कोणताही नवा प्रोजक्ट हातात घेत नाही आहे. दीपिका आणि रणवीर गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांनी कधीच पब्लिकली आपले रिलेशन स्वीकारले नाही.

Web Title: deepika padukone mom arranges grand pre-wedding pooja and invites ranveer family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.