दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या मुंबईतील रिसेप्शनची चर्चा अद्यापही थांबली नाही. रिसेप्शनमध्ये दीपवीर दोघेही एकमेकांना मॅचिंग आऊटफिटमध्ये दिसलेत. दीपवीरचा रॉयल अंदाज चर्चेचा विषय ठरला. विशेषत: दीपिकाने तर सगळ्यांनाचं घायाळ केलं. दीपिकाचा लूक हा एखादी अप्सरा अवतरली असाच होता. दीपिकाने अबु जानी आणि संदीप खोसलाने डिझाईन केलेला आऊटफिट कॅरी केला होता तर रणवीरने घातलेली शेरवानी डिझाईनर रोहित बलने डिझाईन केली होती.
दीपिकाच्या या लूकची तर चर्चा होत आहे. पण मुंबईच्या रिसेप्शनमध्ये दीपिकासोबतच आणखी एका व्यक्तिने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ही व्यक्ती रणवीरच्या कुटुंबियातील एक असून रणवीरच्या खूपच जवळची आहे.
ही व्यक्ती दुसरी कोणीही नसून रणवीर सिंगची आई अंजू भवनानी आहे. रणवीर सिंगची आई अंजू भवनानी दीपिका आणि रणवीरच्या रिसेप्शनमध्ये ब्लॅक-गोल्डन लेहंग्यात दिसल्या होत्या. त्यांच्या लूकची सध्या चांगलीच चर्चा सोशल मीडियावर रंगलेली आहे. मुंबईच्या रिसेप्शनमध्ये दीपिकाचे कुटुंब क्रीम रंगाच्या थिममध्ये तर रणवीरचे कुटुंब काळ्या रंगाच्या थिममध्ये दिसले होते. या रिसेप्शनमध्ये सगळेच छान दिसत होते. पण रणवीरची आई ही अतिशय सुंदर दिसत असून तिची सून दीपिकाला चांगलीच टक्कर देत आहे असे नेटिझन्सचे म्हणणे होते. त्यांनी अशा अनेक प्रतिक्रिया देखील सोशल मीडियावर दिल्या आहेत.
सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर १४ आणि १५ नोव्हेंबरला दीपवीर लग्नबंधनात अडकले. इटलीतील सुप्रसिद्ध लेक कोमो येथे दोघांनीही लग्नगाठ बांधली. यानंतर २१ नोव्हेंबरला बेंगळुरू येथे दोघांच्याही लग्नाचे पहिले रिसेप्शन झाले. यानंतर २८ नोव्हेंबरला मुंबईत दुसरे रिसेप्शन रंगले. या दोन्ही रिसेप्शनमध्ये केवळ दीपिका व रणवीर यांचे जवळचे नातेवाईक व मित्र परिवार हजर होता. आता येत्या १ डिसेंबरला दीपवीरच्या लग्नाचे तिसरे रिसेप्शन होणार आहे आणि हे रिसेप्शन खास बॉलिवूडमधील मित्र-मंडळींसाठी आयोजित केले जाणार आहे. त्यामुळे चाहत्यांचे लक्ष या रिसेप्शनकडे आणि यातील दीपवीरच्या लूककडे लागले आहे.