Join us

काय म्हणता, दीपिका पादुकोणचा हा ‘रॉयल’ ड्रेस तयार करण्यासाठी लागले १६ हजार तास!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2018 12:56 PM

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या मुंबईतील रिसेप्शनची चर्चा अद्यापही थांबली नाही. रिसेप्शनमध्ये दीपवीर दोघेही  एकमेकांना मॅचिंग आऊटफिटमध्ये दिसलेत. दीपवीरचा रॉयल अंदाज चर्चेचा विषय ठरला.

ठळक मुद्देदीपिकाने अबु जानी आणि संदीप खोसलाने डिझाईन केलेला आऊटफिट कॅरी केला होता तर रणवीरने घातलेली शेरवानी डिझाईनर रोहित बलने डिझाईन केली होती.

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या मुंबईतील रिसेप्शनची चर्चा अद्यापही थांबली नाही. रिसेप्शनमध्ये दीपवीर दोघेही  एकमेकांना मॅचिंग आऊटफिटमध्ये दिसलेत. दीपवीरचा रॉयल अंदाज चर्चेचा विषय ठरला. विशेषत: दीपिकाने तर सगळ्यांनाचं घायाळ केलं. दीपिकाचा लूक हा एखादी अप्सरा अवतरली असाच होता.दीपिकाने अबु जानी आणि संदीप खोसलाने डिझाईन केलेला आऊटफिट कॅरी केला होता तर रणवीरने घातलेली शेरवानी डिझाईनर रोहित बलने डिझाईन केली होती.दीपिकाच्या या रिसेप्शनमधील व्हाईट कलरच्या ड्रेसवर गोल्डन कलरची कारीगरी केलेली होती. याच ड्रेसचा मेकिंग व्हिडिओ समोर आला आहे. होय, अबु जानी आणि संदीप खोसला यांनी आपल्या सोशल अकाऊंटवर दीपिकाच्या या ड्रेसचा मेकिंग व्हिडिओ शेअर केला आहे.

अनेक कारागिरांनी या ड्रेसवर वेगवेगळे काम केले. या कामाचे एकूण तास बघितले तर हा ड्रेस तयार होण्यासाठी १६००० तास लागले. या ड्रेससोबत दीपिकाने हेवी ज्वेलरी कॅरी केली होती. तीही खास डिझाईन केली गेली.दीपिका व रणवीर गत १४ व १५ नोव्हेंबरला लग्न केले. यानंतर २१ नोव्हेंबरला बेंगळुरू येथे दोघांच्याही लग्नाचे पहिले रिसेप्शन झाले. यानंतर २८ नोव्हेंबरला मुंबईत दुसरे रिसेप्शन रंगले. या दोन्ही रिसेप्शनमध्ये केवळ दीपिका व रणवीर यांचे जवळचे नातेवाईक व मित्र परिवार हजर होता. आता येत्या १ डिसेंबरला दीपवीरच्या लग्नाचे तिसरे रिसेप्शन होणार आहे आणि हे रिसेप्शन खास बॉलिवूडमधील मित्र-मंडळींसाठी आयोजित केले जाणार आहे. त्यामुळे चाहत्यांचे लक्ष या रिसेप्शनकडे आणि यातील दीपवीरच्या लूककडे लागले आहे.    

टॅग्स :दीप- वीरदीपिका पादुकोणरणवीर सिंग