‘घुमर’ नृत्य करणारी दीपिका पादुकोण नाही एकटी अभिनेत्री! तिच्याआधी ‘या’ अभिनेत्रीने केलायं ‘घुमर’ डान्स!!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2017 8:44 AM
‘पद्मावती’ या चित्रपटाला विरोध करणा-या विरोधकांचा अनेक आक्षेपांपैकी एक आक्षेप आहे, या चित्रपटातील एका गाण्यावर. हा आक्षेप कशावर तर, ‘पद्मावती’तील दीपिका पादुकोणच्या ‘घुमर’ गाण्यावर.
‘पद्मावती’ या चित्रपटाला विरोध करणाºया विरोधकांचा अनेक आक्षेपांपैकी एक आक्षेप आहे, या चित्रपटातील एका गाण्यावर. हा आक्षेप कशावर तर, ‘पद्मावती’तील दीपिका पादुकोणच्या ‘घुमर’ गाण्यावर. राजपूत राजघराण्यातील महाराण्या असे सगळ्यांपुढे नृत्य करत नसतं. त्यामुळे ‘पद्मावती’त राणी पद्मावतीची भूमिका साकारणाºया दीपिकाला असे सर्वांसमोर नाचवणे गैर आहे, असे ‘पद्मावती’ला विरोध करणा-यांचे म्हणणे आहे. खरे तर दीपिकाच्या या ‘घुमर’ गाण्याला जितका विरोध होत आहे, तितक्याच वेगाने हे गाणे, यातील दीपिकाचा ‘घुमर’ डान्स व्हायरल होतो आहे. या गाण्यावर डान्स व्हिडिओ बनवून लोक सोशल मीडियावर शेअर करत आहेत. त्यामुळे ‘घुमर’ सध्या चर्चेत आहे. दीपिकाचा हा ‘घुमर’ डान्स आठवण्यामागे आणखीही एक वेगळे कारण आहे. हे कारण म्हणजे, चित्रपटात ‘घुमर’ डान्स करणारी दीपिका पहिली अभिनेत्री नाहीय. तिच्या आधीही एका अभिनेत्रीने ‘घुमर’ डान्स केला आहे. ही अभिनेत्री कोण? तर करिश्मा कपूर. ALSO READ : OMG!! इंटरनेटवर लिक झाली Padmavati full movie , साडेपाच लाखांवर Views...वाचा संपूर्ण सत्य!होय, करिश्मा कपूरचा ‘जुबैदा’ हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल तर यातील ‘घुमर’ डान्सही तुम्ही पाहिला असेल. यात करिश्मा कपूर लीड रोलमध्ये होती. तिने जुबैदाची भूमिका साकारली होती. चित्रपटात जुबैदा बनलेल्या करिश्माला राजा विजयेंन्द्र सिंहसोबत प्रेम होते आणि ती राजपूत घराण्याची दुसरी सून बनते. राजाच्या पहिल्या पत्नीची भूमिका अभिनेत्री रेखाने साकारली आहे. नव्या राणीच्या स्वागतासाठी ‘घुमर’ नृत्य सादर केले जाते, असे एक दृश्य या चित्रपटात आहे. हे नृत्य पाहुन जुबैदा इतकी आनंदी होते की, ती स्वत: उठून नृत्यात सहभागी होते. पण रेखा तिला रोखते. तू राणी आहेस आणि नृत्य करणाºया महिलांसोबत नाचू शकत नाहीस, असे रेखा तिला समजावताना यात दिसतेय. जुबैदातील हेच गाणे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ते पाहा आणि त्यावरच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा.तूर्तास ‘पद्मावती’चे प्रदर्शन वांद्यात सापडले आहे. वादाच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाची रिलीज डेटही पुढे ढकलण्यात आली आहे.