लग्नाच्या तयारीला लागली दीपिका पादुकोण 'या' शहरात करतेय कुटुंबीयांसोबत शॉपिंग!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2018 4:15 AM
रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांच्या लग्नाच्या चर्चेला सध्या बॉलिवूडमध्ये उधाण आले आहे. स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार दीपिका पादुकोण सध्या बेंगळुरुमध्ये ...
रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांच्या लग्नाच्या चर्चेला सध्या बॉलिवूडमध्ये उधाण आले आहे. स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार दीपिका पादुकोण सध्या बेंगळुरुमध्ये आपल्या कुटुंबीयांसोबत लग्नाची शॉपिंग करते आहे. मिळालेल्या माहितीनुसार दीपिका आपल्या बेंगळुरुमध्ये आपल्या जवळच्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाला वेडिंग रिसेप्शन पार्टी देण्याच्या विचारात आहे. त्यासाठी ती आपली बहिण अनीषा पादुकोण आणि आई उज्जला पादुकोण यांच्यासोबत शॉपिग करते आहे. दीपिकाची मॉम आणि बहिण तिच्यासाठी दागिने खरेदी करते आहे. दीपिका इरफान खानसोबत 'सपना दीदी' चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे पण इरफान खान सध्या उपचारासाठी लंडनला गेला आहे. त्यामुळे इरफान शूटिंगवर परत येईपर्यंत दीपिकाने ब्रेक घेतला आहे आणि ती बेंगळुरुमध्ये लग्नाच्या तयारीला लागली आहे. नुकतेच दीपिकाचे आई-वडिल रणवीरच्या कुटुंबीयांसोबत लग्नाची बोलणी करण्यासाठी मुंबईत आले होते. दीपिकाच्या प्रभादेवीमधल्या घरी ही भेट झाली. त्यानंतर दोन्ही कुटुंबीय एकत्र डिनरलासुद्धा गेले होते. त्यामुळे दीपिका आणि रणवीरच्या लग्नाची तयारी दोन्ही कुटुंबीयांकडून मोठ्या जोरात चालू आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.ALSO READ : प्रियांका चोप्राला मागे टाकत दीपिका पादुकोण बनली ‘Most Followed Person’रामलीलाच्या सेटवर दीपिकाचे रणवीरशी सूत जुळले. दीपिका व रणवीर दोघांच्याही पालकांची हे लग्न मुंबईत व्हावे अशी इच्छा आहे. विशेषत: रणवीरच्या कुटुंबाचा यासाठी आग्रह आहे. कारण रणवीरचे सगळे नातेवाईक दिल्ली व मुंबईत राहतात. कुणालाही रणवीरचे लग्न मिस करायचे नाही. त्यामुळे लग्न मुंबईत व्हावे, असा त्यांचा आग्रह आहे. हे लग्न साऊथच्या प्रथापरंपरेनुसार होईल, असेही कळतेय. यासाठी मुंबईतील काही अलिशान वेन्यूंवर विचार केला जात आहे. यानंतर मुंबईतीलच एका पंचतारांकित हॉटेलमध्ये रिसेप्शन दिले जाणार असल्याचे कळतेय. दीर्घकाळापासून दीपिका व रणवीर या दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा होतेय. पण रणवीर किंवा दीपिका या दोघांनी कधीही अधिकृतपणे हे नाते मान्य केले नाही. यापूर्वी दीपिका व रणवीरच्या अतिशय जवळच्या सूत्रांच्या हवाल्याने दीपिका व रणवीरने लग्नाचा निर्णय घेतला असल्याची बातमी आली होती.