Join us

ऑस्करनंतर दीपिका 'या' प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यासाठी डेव्हिड बेकहम-केट ब्लँचेटसोबत होणार प्रेझेंटर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 11:31 IST

ऑस्करनंतर दीपिका हॉलिवूडच्या या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यासाठी प्रेझेंटर होणार आहे

दीपिका पादुकोण (Deepika Padukone) ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री. दीपिकाला आपण आजवर विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. 'ओम शांती ओम' पासून दीपिकाने केलेली तिच्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात आज 'फायटर'पर्यंत  येऊन पोहोचली आहे. दीपिकने भारतात तर लोकप्रियता मिळवलीच आहे, शिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर दीपिकाला चांगलाच मान आहे. याचा अनुभव पुन्हा एकदा दिसून आला. ऑस्करनंतर (Oscars) दीपिका पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर एका पुरस्कार सोहळ्याची प्रेझेंटर म्हणून भूमिका निभावणार आहे.

दीपिकाला आता '77व्या बाफ्टा' पुरस्कार सोहळ्यात प्रेझेंटर म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. 18 फेब्रुवारी 2024 रोजी लंडनमध्ये होणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यात दीपिका सहभागी होणार आहे. त्यामुळे ऑस्करमध्ये सहभागी झाल्यावर आता बाफ्टामध्ये सहभागी झाल्याने दीपिकाने पुन्हा एकदा भारतीयांची शान अभिमानाने उंचावली आहे.

दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी प्रेक्षक 'बाफ्टा' पुरस्कारांसाठी खूप उत्सुक आहेत. 'बाफ्टा' पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर जगभरातले स्टार्स त्यांच्या फॅशनने प्रेक्षकांचं मन जिंकतात. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, दीपिका पदुकोण '77 व्या बाफ्टा' पुरस्कारांमध्ये डेव्हिड बेकहम, दुआ लिपा आणि केट ब्लँचेटसोबत स्टेज शेअर करताना दिसणार आहे. प्रेझेंटर म्हणून सहभागी होण्यासाठी दीपिकाला 'बाफ्टा'ने आमंत्रित केले आहे.

टॅग्स :दीपिका पादुकोणहॉलिवूडऑस्कर