बॉलिवूडवर सध्या दीपवीरच्या लग्नाचा फिव्हर आहे. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाबाबत रोज नव्या काहींना काहीतरी चर्चा होतायेत. इटलीतल्या लेक कोमोमध्ये बी-टाऊनच्या बाजीराव मस्तानीने सात फेरे घेतले. 14 नोव्हेंबरला कोंकणी पद्धतीने तर 15 नोव्हेंबरला सिंधी पद्धतीने दीपिका रणवीर विवाहबद्ध झाले. मोजक्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत राजेशाही थाटात हा विवाहसोहळा संपन्न झाला. दीपिका व रणवीरने आपल्या लग्नाचे फोटो शेअर होऊ नयेत, यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला.
दीपिका आणि रणवीरने दोन्ही दिवशी सब्यासाचीने डिझायन केलेल कपडे परिधान केले होते. सिंधी पद्धतीने केलेल्या विवाह सोहळ्याला दीपिकाने लाल रंगाचा लेहंगा परिधान केला होता. पिंकविल्याच्या रिपोर्टनुसार या लेहंग्याची किंमत तब्बल 8.95 लाख इतकी आहे.
लग्नाच्या विधी पूर्ण झाल्यावर लवकरच दीपवीर भारतात परतणार आहेत. २१ नोव्हेंबरला दीपिकाचे गाव बंगळुरूमध्ये स्वागत समारंभ पार पडणार आहे. ज्याचे आयोजन दीपिकाच्या आई वडिलांनी केले आहे. दीपिका व रणवीरने मुंबईत २८ नोव्हेंबरला रिसेप्शनचे आयोजन केले आहे. जे रात्री ८ वाजता सुरू होणार आहे. या रिसेप्शन पार्टीचे आयोजन रणवीर सिंगच्या आई-वडिलांनी केले आहे.