रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांचा लग्नसोहळा सुरू झाला आहे. इटलीच्या लेक कोमो येथे अगदी काही क्षणात दीपिका व रणवीर लग्नगाठ बांधतील. ताज्या अपडेट्सनुसार, दोन्हींकडचे व-हाडी लग्नमंडपात पोहोचले आहेत. वेडिंग वेन्यू ७०० वर्षे जुना आहे. संपूर्ण लग्नमंडप वॉटर लीलीच्या फुलांनी सजवण्यात आला आहे. ही फुले दीपिकाची आवडती फुले आहेत. वेडिंग वेन्यू एक म्युझियम आहे. याठिकाणी थांबण्यास खोल्या नाहीत. याचमुळे दीपवीर आणि त्यांचे कुटुंबीय वेडिंग वेन्यूपासून काही दूर अंतरावर मुक्कामास आहेत. दीपिका व रणवीरचे लग्न भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी २ ते ५ या वेळात होणार आहे.
Deepika Padukone Ranveer Singh Wedding: चुकुनही पाहायला विसरू नका दीपवीरच्या लग्नाआधीचे हे क्षण !!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 14:54 IST