इटलीच्या सुप्रसिद्ध लेक कोमो येथे दीपिका पादुकोण व रणवीर सिंग आज लग्नगाठ बांधणार आहेत. कालपासून या शाही लग्नसोहळ्याच्या विधी सुरु झाल्या. काल १३ नोव्हेंबरला दीपिका व रणवीरची मेहंदी आणि संगीत सेरेमनी रंगली. हातावर मेहंदी लागताच दीपिका कमालीची भावूक झाली. तिच्या डोळ्यांत अश्रू तरळले. यावेळी रणवीरने तिला सांभाळले आणि दीपिकाच्या ओठांवर पुन्हा हसू फुलले.
सोशल मीडियावरच्या दीपवीरच्या फॅन पेजवर याबाबतची पोस्ट शेअर करण्यात आली आहे. पोस्टमध्ये लिहिल्यानुसार, मेहंदी सेरेमनीत दीपिकाच्या डोळ्यांत अचानक अश्रूंनी गर्दी केली. तिच्या डोळ्यांत अश्रू होते. यावेळी रणवीर पुढे गेला आणि त्याने अलगद तिचे अश्रू टीपत तिला मिठीत घेतले. रणवीरने मिठीत घेताच दीपिका पुन्हा हसू लागली. दीपिका इमोशनल झाली त्यावेळी शुभा मुद्गल ठुमरीवर परफॉर्म करत होती.
दीपवीरचा लग्नसोहळा अतिशय खासगी असल्याने या सोहळ्याचा एकही फोटो बाहेर आला नाही. पण या सोहळ्यातील या भावूक क्षण मात्र शब्दरूपात सगळीकडे व्हायरल झाला. यानंतर दीपवीरने संगीत सोहळ्यात धम्माल मस्ती केली. रणवीर यावेळी फुल मूडमध्ये होता. त्याने दीपिकासाठी ‘गुंडे’मधील ‘तुने मारी एंट्री’ गायले. संगीत समारोहात सगळेच भारतीय पोशाखात होते. ‘मेहंदी है रचने वाली’, ‘काला शा काला’च्या स्वरांची धूम होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही सेरेमनीत रणवीरने प्रचंड एन्जाूय केले. संगीत सेरेमनीत रोमॅन्टिक सॉन्ग, पंजाबी, सुफी गाणी वाजवली गेलीत. गायिका हर्षदीप कौरने अनेक हिट गाणी यावेळी सादर केलीत.आज दीपवीर कायमचे एकमेकांचे होणार आहेत. आज व उद्या दोघांचाही लग्नसोहळा रंगणार आहे. कोंकणी आणि सिंधी अशा दोन्ही पद्धतीने हा रॉयल सोहळा पार पडणार आहे.