दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग आज इटलीत सात फेरे घेणार आहेत. इटलीतल्या लेक कामा शहरात ते विवाह बंधनात अडकणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार नवरदेव रणवीर सिंग सी प्लेनमधून आपल्या नववधूला घेऊन जाणार आहे.
रणवीर सिंग आणि दीपिकाच्या मंगळवारी रात्री झालेल्या संगीत सेरेमनीमध्ये फक्त त्यांचे जवळचे लोकच सामील झाले होते. हर्षदीप कौरने संगीत सेरेमनीमध्ये गाणी गायिली. इटलीमध्ये दोन्ही कुटुंबीयांनी लग्नाच्या विधीना सुरुवात केली आहे. रणवीर सिंगचे नारळ पाणी देऊन खास स्वागत करण्यात आले. दीपिका कोकणी आहे आणि कोकणीमध्ये नारळ हा शुभ मानला जातो. आज कोकणीपद्धतीने लग्न होणार आहे तर उद्या सिंधी रिती-रिवाजाप्रमाणे. मीडिया रिपोर्टनुसार दीपवीरने लग्नाला खूप कमी लोकांना बोलवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार जवळपास फक्त 30 लोकांना लग्नाचे आमंत्रण आहे. फराह खान, शाहरुख खान आणि संजय लीला भन्साळी लग्नाला हजेरी लावण्याची चर्चा आहे.
रणवीर व दीपिका संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला-रामलीला चित्रपटाच्या शूटींगदरम्यान एकमेकांच्या जवळ आले होते. तेव्हापासून या कपलच्या लव्हलाईफची चर्चा होती. अर्थात दीपिका व रणवीर दोघांपैकी कुणीही अधिकृतपणे त्यांच्यातील नाते मीडियासमोर मान्य केलेले नव्हते. त्यानंतर त्या दोघांनी बाजीराव मस्तानी, पद्मावत यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. त्या दोघांची केमिस्ट्री तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. तेव्हापासून या कपलच्या लव्हलाईफची चर्चा होती. अर्थात दीपिका व रणवीर दोघांपैकी कुणीही अधिकृतपणे त्यांच्यातील नाते मीडियासमोर मान्य केलेले नव्हते.