रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांची लग्नघटिका जवळ येतेय. येत्या १४-१५ नोव्हेंबरला दोघेही इटलीतील सुप्रसिद्ध लेक कोमो येथे लग्नबंधनात अडकणार आहेत. हा लग्नसोहळा अतिशय खासगी असणार आहे. त्यामुळे लग्नात केवळ ३० पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. हे व-हाडी इटलीला पोहोचलेत आणि लग्नाची धम्माल सुरू झालीय. रणवीर आणि दीपिका दोन्ही कुटुंबांचा, दोन्हीकडच्या व-हाड्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. रणवीरकडच्यांच उत्साह तर ओसंडून वाहतोय. याचा पुरावा म्हणजे, काही ताजे फोटो. होय, ‘लडके साईड की लेडिज’ने सोशल मीडियावर काही फोटो टाकले आहेत. हे फोटो सगळे काही सांगणारे आहे. सिंधी लग्नात हमखास दिसणारा ढोलही इटलीत पोहोचला आहे.
गत १० नोव्हेंबरला भावी वर-वधू रणवीर व दीपिका इटलीला रवाना झालेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या १३ नोव्हेंबरला म्हणजे, उद्या दीपवीरची संगीत सेरेमनी आहे. यात दोघांचे जवळचे मित्र आणि कुटुंबीयचं तेवढे सहभागी होती. १४-१५ ला लग्नसोहळा होणार आहे.
कोकणी आणि सिंधी अशा दोन्ही पद्धतीने हा विवाह होणार आहे. कोकणी पद्धतीने होणा-या विवाहात दीपिका साडी आणि सोन्याचे दागिणे घालणार आहे. तर सिंधी पद्धतीने होणाºया विवाहप्रसंगी लहंगा घालणार आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध डिझाईनर सब्यसाची यांनी डिझाईन केलेला हा लहंगा गुलाबी आणि जांभळ्या रंगाचा असल्याचे कळतेय.ताजी बातमी खरी मानाल तर रणवीरची वरात अगदी जबरदस्त असणार आहे. तो कार वा घोडीवर नाही तर सीप्लेनमधून एन्ट्री करणार आहे. २८ नोव्हेंबरला मुंबईत दीपवीरचे ग्रॅण्ड रिसेप्शन आयोजित केले आहे. हे रिसेप्शन रणवीरचे आई-वडिल होस्ट करणार आहेत. त्यापूर्वी २१ नोव्हेंबरला बेंगळुरूमध्ये दीपिकाचे आई-वडिल दुसरे ग्रॅण्ड रिसेप्शन देणार आहेत.