भारतीय संस्कृतीत विवाहानंतर महिला आपल्या नावासोबत नवऱ्याचे नाव व आडनाव वापरतात. मात्र अशी करण्याची सक्ती नसून कित्येक महिला लग्नापूर्वीचेच नाव वापरतात. आता अभिनेत्री सोनम कपूरने न्यूमरोलॉजिस्ट संजय बी. जुमानीच्या सांगण्यानुसार लग्नानंतर सोनम के. आहुजा असे केले. प्रीती झिंटाने देखील न्युमरोलॉजिस्टच्या सूचनेनंतर पती जीन गुडइनफचे नाव आपल्या नावासोबत वापरायला सुरूवात केली. दीपिका पादुकोण व रणवीर सिंग नुकतेच विवाहबद्ध झाले आहेत. तर दीपिका आता रणवीरचे नाव वापरेल का, हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. न्यून्यूमरोलॉजीनुसार दीपिकाच्या नावातच नंबर एक आहे जो लीडरशीप दर्शवतो. मात्र रणवीरचा आर आणि सिंगचा एस जर तिच्या नावासोबत जोडेल तर न्युमॅरिकल वायब्रेशन बिघडू शकते. पीपींगमूनच्या रिपोर्टनुसार, न्यूमरोलॉजिस्ट संजय बी. जुमानी यांनीदेखील दीपिकाला नाव न बदलण्याचा सल्ला दिला आहे. दीपिका नाव बदलण्याच्या बाबतीत काय निर्णय घेते, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.
बऱ्याच दिवसांपासून रणवीर सिंग व दीपिका पादुकोण यांच्या लग्नाची सुरू होती. नुकतेच ते दोघे विवाह बंधनात अडकले आहेत. या दोघांचा पारंपरिक कोंकणी पद्धतीने विवाह संपन्न झाला. इटलीतील लेक कोमो इथल्या नयनरम्य व्हिलामध्ये हा सोहळा पार पडला. त्यांच्या जवळच्या नातलगांच्या आणि मित्र मैत्रिणीच्या उपस्थितीत लग्न सोहळा पार पडला. मात्र या विवाह सोहळ्यातील फोटो अद्याप समोर न आल्यामुळे चाहते नाराज झाले आहेत.