Join us

दीपिकाने नाकारला 500 कोटींचा चित्रपट; 'तो' ठरला ब्लॉकबस्टर, 'या' अभिनेत्रीचं चमकलं नशीब

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 11:28 AM

दीपिकाच्या एका नकारानंतर सलमान खानच्या हिरोईनचं नशीब चमकलं आणि ती काही काळातच अधिक लोकप्रिय झाली. 

अभिनेत्री दीपिका पादुकोण ही बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे. उत्कृष्ट प्रोजेक्ट्स आणि जबरदस्त अभिनय करणारी दीपिका आज लाखो लोकांच्या हृदयांवर राज्य करते. दीपिकाने तिच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला. पण याच दरम्यान अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटही नाकारले. दीपिकाच्या एका नकारानंतर सलमान खानच्या हिरोईनचं नशीब चमकलं आणि ती काही काळातच अधिक लोकप्रिय झाली. 

2013 मध्ये, चित्रपटगृहांमध्ये एक चित्रपट प्रदर्शित झाला ज्याने बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड तोडले. या चित्रपटात आमिर खानसोबतच कतरिना कैफ मुख्य भूमिकेत होती. हा चित्रपट यापूर्वी दीपिका पादुकोणला ऑफर करण्यात आला होता पण तिने हा चित्रपट करण्यास नकार दिला होता. त्यानंतर कतरिना कैफला हा चित्रपट मिळाला. हा चित्रपट प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर त्याची तुफान चर्चा रंगली आहे. 

मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर निर्मात्यांनी सर्वप्रथम दीपिकाशी संपर्क साधला होता. पण त्यावेळी अभिनेत्री अयान मुखर्जीच्या 'ये जवानी है दिवानी'च्या शूटिंगमध्ये खूप व्यस्त होती. याच कारणामुळे दीपिकाने त्यावेळी हा चित्रपट करण्यास नकार दिला होता. 'धूम 3' हा चित्रपट विजय कृष्ण आचार्य यांनी दिग्दर्शित केला होता. 

बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, 'धूम 3' ने जगभरात 556.74 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर बजेट सुमारे 175 कोटी रुपये होतं. आमिर खान, कतरिना कैफ, उदय चोप्रा व्यतिरिक्त 'धूम 3' मध्ये अभिषेक बच्चन देखील दिसला होता. यापूर्वी 'धूम' चित्रपटाचे दोन पार्ट प्रदर्शित झाले होते आणि दोन्ही पार्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले होते. 

टॅग्स :दीपिका पादुकोणकतरिना कैफ