सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ड्रग्स कनेक्शनमध्ये अटक झालेल्या रिया चक्रवर्तीला मुंबई उच्च न्यायालयाकडून अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. पाठोपाठ एनसीबीच्या चौकशीला सामो-या गेलेल्या अभिनेत्री आपल्या कामावर परतण्याच्या तयारीत आहेत. दीपिका पादुकोण लवकरच शूटींगसाठी गोव्याला रवाना होणार असल्याचे कळतेय.टाईम्स आॅफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे. ड्रग्ज प्रकरणात दीपिकाचे नाव समोर आले तेव्हा ती गोव्यात शकुन बत्रा यांच्या सिनेमाचे शूटींग करत होती. एनसीबीने समन्स बजावल्यानंतर शूटींग सोडून दीपिकाला मुंबईत परतावे लागले होते.
एनसीबीसमोर हजर झालेल्या दीपिकाची सलग चार तास चौकशी झाली. तिचा मोबाईलही एनसीबीने ताब्यात घेतला. पण सूत्रांचे मानाल तर अद्याप दीपिका ड्रग्ज प्रकरणात सहभागी असल्याचे कुठलेही ठोस पुरावे एनसीबीला मिळालेले नाहीत.चौकशीसाठी बोलवण्यात आलेल्या एकाही अभिनेत्रीला आम्ही क्लिनचीट दिलेली नाही, असा दावा एनसीबीकडून करण्यात येत आहे. मात्र अद्याप तरी एनसीबीने दीपिका व अन्य अभिनेत्रींना दुसरा समन्स बजावलेला नाही. तूर्तास दीपिकाने तरी कामावर परतण्याची तयारी सुरु केली आहे. शकुन बत्राच्या सिनेमाचे शूटींग पूर्ण करण्यासाठी ती लवकरच गोव्याला रवाना होणार असल्याचे कळते.
शकुन बत्रा यांच्या या सिनेमात दीपिका पादुकोण शिवाय अनन्या पांडे, सिद्धार्थ चतुर्वेदी मुख्य भूमिकेत आहेत. हा एक रोमॅन्टिक ड्रामा आहे. अर्थात अद्याप सिनेमाचे नाव ठरलेले नाही.यापूर्वी दीपिका मेघना गुलजारच्या ‘छपाक’ या सिनेमात दिसली होती. 2020 च्या सुुरुवातीला हा सिनेमा रिलीज झाला होता.
क्लीन चीट नाहीच...
NCB म्हणजेच नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने ड्रग्स केसमध्ये नुकतेच बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुलप्रीत सिंहला समन्स पाठवला होता. गेल्या आठवड्यात त्यांची अनेक तास चौकशी करण्यात आली. दरम्यान अशी चर्चा होती की, या अभिनेत्रींना एनसीबीने क्लीन चीट दिली आहे. पण बुधवारी ही चर्चा खोटी असल्याची आणि अभिनेत्रींना क्लीन चीट न दिल्याची माहिती एनसीबीने दिली आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ज्या बातम्यांमध्ये सांगण्यात आले आहे की, ज्यांची चौकशी करण्यात आली होती त्यांना क्लीन चीट देण्यात आली आहे. पण यात काहीच तथ्य नाही.
रिया चक्रवर्तीची तुरुंगातून सुटका
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ड्रग्स कनेक्शनमध्ये अटक झालेल्या रिया चक्रवर्तीला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. ड्रग्स खरेदी केल्याच्या आरोपाखाली रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती आणि इतर 18 आरोपींची आज न्यायालयीन कोठडी संपणार होती. मात्र, याप्रकरणी मंगळवारी सुनावणी करताना मुंबई कोर्टाने रिया आणि शौविक चक्रवर्तीच्या न्यायालयीन कोठडीत 20 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली होती. त्यानंतर, आज न्यायालयाने रियाला सशर्त जामीन मंजूर केला असून शौविकचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
संपल्या नाहीत दीपिका, सारा आणि श्रद्धाच्या अडचणी, NCB कडून क्लीन चीट नाहीच...
दीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क!!
एनसीबी अधिका-यांचे प्रश्न ऐकून दीपिकाला एकदा नाही तिनदा कोसळले रडू!!