बॉलिवूडची 'डिंपल क्वीन' दीपिका पदुकोण (Deepika Padukone) सध्या मदरहुड एन्जॉय करत आहे. सप्टेंबर महिन्यात तिने मुलीला जन्म दिला. रणवीर आणि दीपिकाने लेकीचं नाव 'दुआ' (Dua) असं ठेवलं. या नावावरुन काहींनी नाराजीही व्यक्त केली. लेकीच्या जन्मानंतर दीपिका बंगळुरूला आईवडिलांकडे गेली होती. तेव्हा मायलेकीची झलक दिसली होती. आता दीपिका पुन्हा मुंबईत आली आहे. चिमुकल्या 'दुआ'ला छातीशी कवटाळून ती विमानतळावर दाखल झाली.
दीपिका पदुकोण दोन दिवसांपूर्वीच दिलजीत दोसांझच्या बंगळुरू येथील कॉन्सर्टमध्ये दिसली होती. आई झाल्यानंतर ती पहिल्यांदाच सर्वांसमोर आली होती. दिलजीत सोबत ती स्टेजवरही आली. दीपिकाने ही कॉन्सर्ट खूप एन्जॉय केली. त्याचे काही क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता दीपिका मुंबईत परत आली आहे. तिचा कलिना विमानतळावरील व्हिडिओ व्हायरल होतोय. दीपिकाने लाल ड्रेस परिधान केला आहे आणि गॉगल लावला आहे. तर चिमुकल्या 'दुआ'ला तिने कवटाळून घेतलं आहे. मायलेकीची झलक पाहून चाहते खूश झालेत. voompla इन्स्टाग्रामवर पेजवर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
दीपिका नुकतीच 'सिंघम अगेन' मध्ये दिसली. मात्र लेकीच्या जन्मानंतर ती अद्याप कामावर परतलेली नाही. सिंघमच्या ट्रेलर लाँचलाही ती हजर नव्हती. दीपिका पुन्हा कधी काम सुरु करणार याची चाहते वाट पाहत आहेत. तसंच रणवीर-दीपिका आपल्या लाडक्या लेकीची झलक कधी दाखवणार याकडेही लक्ष लागलं आहे.