सध्या चित्रपटसृष्टीत अभिनेता रणवीर सिंहची भलतीच क्रेझ आहे. त्याने साकारलेला 'सिम्बा' चित्रपटातील संग्राम भालेराव भलताच भाव खावून गेला. 'सिम्बा' सिनेमाच्या प्रमोशनमध्येही रणवीर सिंहची ड्रेसिंग स्टाइल सा-यांसाठी लक्षवेधी ठरली आहे. वेगवेगळ्या एव्हेंटसमध्ये रणवीरचा ड्रेसिंग स्टाइल पाहून सारेच थक्क व्हायचे. रणवीरचा आता ‘गली बॉय’ सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाच्या प्रमोशन दरम्यानही रणवीर ज्याप्रकारचे अतरंगी कपडे घालून दिसतोय, त्यावरून त्याची जोरदार खिल्ली उडवली जातेय. त्याच्या चित्र-विचित्र स्टाइलवरचे अनेक मजेदार मीम्स व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर रणवीरचा अतरंगी फोटो पाहतचा नेटीझन्स मात्र त्याला अनेक प्रश्न विचारताना दिसतायेत. रणवीर दीपिकाचे कपडे उधार घेतो की काय असाही विनोदी सवाल अनेकजण त्याला सोशल मीडियावर विचारतात. मात्र रणवीर नाही तर मी त्याचे कपडे उधार घेते असं मजेशीर उत्तर दीपिकानं नेटीझन्सना दिले आहे.