Join us

बलात्काराचा आरोप असलेल्या ‘या’ अभिनेत्यासोबत दीपिका पादुकोणला करायचा रोमान्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2018 2:52 PM

वर्षभरापूर्वी बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण हिने मनातील एक इच्छा बोलून दाखविताना म्हटले होते की, तिला ‘फास्ट अ‍ॅण्ड फ्यूरिअस’चा अभिनेता ...

वर्षभरापूर्वी बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण हिने मनातील एक इच्छा बोलून दाखविताना म्हटले होते की, तिला ‘फास्ट अ‍ॅण्ड फ्यूरिअस’चा अभिनेता वीन डिझेलकडून मुले हवी आहेत. आता ‘पद्मावत’च्या या अभिनेत्रीने पुन्हा एक इच्छा व्यक्त केल्याने तिचे चाहते दंग झाले आहेत. एका चॅट शोदरम्यान दीपिकाने तिला स्क्रीनवर कोणासोबत रोमान्स करायचा हे बोलून दाखविले आहे. नेहा धुपियाच्या टॉक शोमध्ये दीपिका बहीण अनिशा पादुकोणसोबत पोहोचली होती. नेहाने शोदरम्यान दीपिकाला विचारले की, तुला कोणत्या अभिनेत्यासोबत रोमॅण्टिक सीन करायचा आहे? यावर उत्तर देताना दीपिका पादुकोणने एका हॉलिवूड अभिनेत्याचे नाव घेतले. होय, अभिनेता जेम्स फ्रॅण्को याचे नाव घेताना दीपिकाने म्हटले की, मला त्याच्यासोबत रोमॅण्टिक सीन करण्याची इच्छा आहे. दीपिका पादुकोणच्या या उत्तरामुळे तिच्या चाहत्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ३९ वर्षीय जेम्स फ्रॅण्को याच्यावर बºयाचशा महिलांनी शारीरिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. गोल्डन ग्लोब विजेता असलेल्या या अभिनेत्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करणाºयांमध्ये चार विद्यार्थिनींचाही समावेश आहे. यावेळी नेहाने दीपिकाला हेदेखील विचारले होते की, तिच्या मते, इंडस्ट्रीतील बेस्ट किसर कोण आहे? याचे उत्तर देताना दीपिकाने अभिनेता रणवीर सिंग याचे नाव घेतले होते. दीपिका-रणवीरने बºयाचशा चित्रपटांमध्ये काम केले. ‘रामलीला’ या चित्रपटात दोघांचे लीपलॉक सीन प्रेक्षकांना बघावयास मिळाले. त्याचबरोबर सध्या हे दोघे संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ या चित्रपटात झळकत आहेत.