दीपिका पादुकोण व रणवीर सिंग यांच्या मुंबईतील रिसेप्शनला बॉलिवूडच्या बहुतांश सर्वच सेलिब्रिटींनी हजेरी लावली. पण एक चेहरा मात्र मिसींग होता. तो म्हणजे, रणबीर कपूर. होय, दीपिकाचा एक्स-बॉयफ्रेन्ड रणबीर या रिसेप्शनमध्ये दिसला नाही. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारण ब्रेकअप झाले असले तरी रणबीर व दीपिका चांगले मित्र आहेत. त्यामुळे दीपिकाच्या रिसेप्शनला रणबीर का आला नाही, असा प्रश्न अनेकांच्या मनात होता. अखेर दीपिकानेच या प्रश्नाचे उत्तर दिलेय.
अलीकडे ला दिलेल्या मुलाखतीत दीपिका यावर बोलली. रणबीर तुझ्या लग्नाच्या रिसेप्शनला का आला नाही, असे दीपिकाला विचारण्यात आले. यावर दीपिका म्हणाली की, आम्ही अद्याप यावर बोललेलो नाही. म्हणजे, रिसेप्शनआधी आम्ही बोललो होतो. पण रिसेप्शननंतर आमच्यात बोलणे झाले नाही. पण तो रणबीर आहे. त्यामुळे तो रिसेप्शनला न येणे माझ्यासाठी सरप्राईजिंग नाही. आमच्यात असेच नाते आहे आणि हेच या नात्याची सगळ्यांत सुंदर गोष्ट आहे. काहीही न बोलता सगळे काही बोलले जाते.
दीपिकाच्या रिसेप्शनला रणबीर तर आला नाहीच. पण आलिया भट्टही आली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रणबीर व आलिया दोघेही ‘ब्रह्मास्त्र’च्या शूटींगमध्ये बिझी होते. तुम्हाला ठाऊक आहेच की, सध्या रणबीर व आलिया एकमेकांना डेट करत आहेत.
या मुलाखतीत दीपिका पती रणवीरबद्दलही भरभरून बोलली. रणवीर तुझ्यासाठी स्पेशल आहे, हे तुला कधी जाणवले, या प्रश्नावर तिने मनमोकळे उत्तर दिले. मी सिंगापूरमध्ये एका अवार्ड फंक्शनदरम्यान रणवीरला पहिल्यांदा भेटले होते. यानंतर मी यशराज स्टुडिओमध्ये होती. रणवीरही तिथे होता. तो फ्लर्ट करत होता. त्यावेळी तो कुण्या दुसऱ्या मुलीला डेट करत होता. त्यामुळे मला हसू येत होते. पुढे आम्ही डेट करू लागलो. आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये भेटायचो. पण संजय लीला भन्साळींच्या घरी ‘रामलीला’ची तयारी करत असतानाचे ते दिवस आमच्यासाठी सर्वात स्पेशल होते, असे तिने सांगितले.