सहा वर्षांपर्यंत एकमेकांना डेट केल्यानंतर या लव्हबर्ड्सने लग्न केले. आम्ही बोलतोय ते दीपिका पादुकोण व रणवीर सिंग यांच्याबद्दल. 2018 साली इटलीच्या लेक कोमो येथे दीपवीरने कोकणी आणि सिंधी परंपरेनुसार लग्न केले होते. या अतिशय खासगी सोहळ्यात अतिशय जवळचे कुटुंबीय व मित्र उपस्थित होते.
2013 साली संजय लीला भन्साळींच्या ‘राम लीला’ या सिनेमाच्या शूटींगदरम्यान दीपवीर एकमेकांच्या प्रेमात पडले होते. दीपिकाच्या आयुष्यात त्याआधी काही पुरूष आले होते. तिचे नाव अनेकांशी जोडले गेले होते. रणबीर कपूरसोबतच्या ब्रेकअपच्या वेदना तिने सहन केल्या होत्या. रणवीरला जोडीदार निवडताना मात्र ती अगदी बिनधास्त होती. मुळात रणवीरसोबत लग्न करण्याचा तिच्या निर्णयामागे एक भक्कम कारण होते.
होय, दैनिक भास्कर कॉन्क्लेव्हमध्ये पत्रकार बरखा दत्त यांना दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत दीपिकाने याचा खुलासा केला होता. मी एक मोठी स्टार आहे आणि माझ्याकडे त्याच्यापेक्षा अधिक पैसा आहे, याचा रणवीरने सन्मान केला. माझ्या यशाचा आणि मी कमावलेल्या पैशाचा तो आदर करतो,यामुळे मी रणवीरशी लग्न केले. लग्नाआधी मी एक आघाडीची अभिनेत्री बनले होते. मी त्याच्यापेक्षा अधिक कमावत होते, त्याच्यापेक्षा अधिक काम करत होते. अनेकदा कामात बिझी असल्यामुळे मी घरी जाऊ शकत नव्हते. पण यामुळे आमच्या नात्यावर कोणताही निगेटीव्ह परिणाम झाला नाही. रणवीरने माझ्यासकट माझ्या कामाचा सन्मान केला. त्याची हीच गोष्ट मला सर्वाधिक भावली. आमचे नाते अनोखे आहे आणि मला आयुष्यभर या नात्यात राहायला, ते निभवायला आवडेल, असे दीपिका या मुलाखतीत म्हणाली होती.
दीपिकाकडे सध्या अनेक बिग बजेट सिनेमा आहेत. शाहरुख खानसोबत ती 'पठाण'मध्ये झळकणार आहे. नंतर प्रभास बरोबर नाग अश्निवीच्या बहुभाषिक सिनेमात काम करत आहे. ह्रतिक रोशनसोबत ती 'धूम 4'मध्ये देखील झळकण्याची शक्यता आहे.
मधु मंटेना इतक्या कोटींमध्ये हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोणला घेऊन बनवणार रामायण