Join us

'पिकू'ला ९ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दीपिकाने शेअर केला Unseen फोटो; इरफानच्या आठवणीत भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 13:37 IST

अमिताभ बच्चन - इरफान - दीपिका पदुकोन यांच्या गाजलेल्या 'पिकू' सिनेमाला ९ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त दीपिकाने एक खास Unseen फोटो शेअर करत किस्सा सांगितलाय (piku, deepika padukone, irrfan)

'पिकू' सिनेमा सर्वांना आठवत असेलच. अमिताभ बच्चन - दीपिका पदुकोन - इरफान यांची प्रमुख भूमिका असलेला 'पिकू' सिनेमा चांगलाच लोकप्रिय झाला. २०१५ साली आलेल्या 'पिकू' सिनेमाने चाहत्यांची चांगलीच पसंती मिळवली. 'पिकू'च्या साध्या सोप्या कथानकामुळे लोकांनी सिनेमावर भरभरुन प्रेम केलं. या सिनेमाला आज ९ वर्ष पूर्ण झाली आहेत, त्यानिमित्त दीपिकाने एक खास फोटो शेअर करत आठवण सांगितली आहे.

दीपिकाने 'पिकू'च्या सेटवरचा एक फोटो शेअर केलाय. यात पाहायला मिळतं की, अमिताभ-इरफान-दीपिका एकत्र बसलेले आहेत. अमिताभ यांना जेवणाचं ताट दिलं जातंय. त्यावेळी अमिताभ दीपिकाकडे बघून इरफानला इशारा करतात. अमिताभ यांनी दीपिकाच्या एका सवयीबद्दल सांगितलंं होतं की, "दीपिकाला दर ३ मिनिटाला भूक लागून ती काही ना काही खाते." हेच आठवत दीपिकाने या पोस्टखाली कॅप्शन लिहिलंय की, "त्यांना सर्वांना सांगायला आवडतं की मी किती खाते ते!" याशिवाय दीपिकाने इरफानची आठवणही जागवली आहे.

'पिकू' सिनेमाबद्दल सांगायचं तर... शूजित सरकार यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. या सिनेमात अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोन आणि इरफान यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. सिनेमाच्या कथेचं कौतुक झालंच शिवाय सर्व कलाकारांच्या अभिनयालाही प्रेक्षकांची पसंती मिळाली. या सिनेमातील इरफान खान आज आपल्यात नाही. कॅन्सरमुळे इरफानने २०२० ला जगाचा निरोप घेतला.

टॅग्स :दीपिका पादुकोणअमिताभ बच्चनइरफान खान