बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण नेहमीच तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. पण सध्या काही दिवसांपासून दीपिका तिच्या प्रेग्नेंसीमुळे सगळ्यात जास्त चर्चेत आहे. सोमवारी लोकसभा निवडणुकीत रणवीर व दीपिका पांढरे शर्ट व डेनिम पँट अशा लूकमध्ये मतदानासाठी आले होते. यावेळी दीपिका पदुकोणचा बेबी बंप पाहायला मिळला. अनेक पापाराझी अकाउंटवरून दीपिका व रणबीरचे हे व्हिडीओ शेअर करण्यात आले. पण, यानंतर अनेकांनी दीपिकाला 'फेक बेबीबंप' म्हणत ट्रोल केलं. आता दीपिकानं या ट्रोलिंगनंतर इन्स्टाग्रामवर पहिली पोस्ट शेअर केली आहे.
दीपिकाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. प्रेग्नेंसीवरुन ट्रोलिंग झाल्यानंतर दीपिकाची ही पहिली पोस्ट आहे. शुक्रवारी लाईव्ह येणार असल्याचे तिनं चाहत्यांना सांगितलं. पोस्टमध्ये तिनं लिहलं, 'हाय, मी उद्या लाईव्ह येत आहे, त्यामुळे माझ्याशी कनेक्ट रहा, ओके बाय'. म्हणजेच आज 24 मे रोजी दीपिका ही इन्स्टाग्रामवर लाईव्ह येत आहे.
दीपिकाच्या या पोस्टनंतर तिच्या चाहत्यांची अस्वस्थता वाढली आहे. ती कोणत्या मुद्द्यावर सोशल मीडियावर लाईव्ह येत आहे हे त्यांना जाणून घ्यायचं आहे. या लाईव्ह सेशनमध्ये दीपिका काय बोलणार? प्रेग्नेंसीवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर सडेतोड उत्तर देणार, की 'कल्की 2898AD' आणि 'सिंघम अगेन' या तिच्या पुढील चित्रपटांबद्दल काही बोलणार किंवा इतर कोणती घोषणा करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी 29 फेब्रुवारी 2024 रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. पोस्टमध्ये स्टार कपलने खुलासा केला आहे की,"सप्टेंबर 2024 मध्ये त्यांच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन होणार आहे". दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अलिकडेच तिचा 'फायटर' (Fighter) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. दीपिकाचा अजय देवगन स्टारर 'सिंघम अगेन' (Singham Again) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच दाक्षिणात्य सुपरस्टार अजय देवगनच्या 'कल्कि 2898 एडी' या चित्रपटातही अभिनेत्री झळकणार आहे.