Join us

कंगनानंतर ही अभिनेत्री घेतेय सर्वाधिक मानधन, फी ऐकून तुमचे डोळे होतील पांढरे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 3:12 PM

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग लग्नानंतर पहिल्यांदाच '83' सिनेमात स्क्रिन शेअर करणार आहेत. त्यामुळे हा सिनेमा दीपवीरच्या जोडीसाठी खास आहे.

ठळक मुद्देदीपवीरच्या जोडीला एकत्र पाहण्यासाठी आतुर असतील यात काहीच शंका नाही. दीपिकाने या सिनेमात रणवीर सिंगच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग लग्नानंतर पहिल्यांदाच '83' सिनेमात स्क्रिन शेअर करणार आहेत. त्यामुळे हा सिनेमा दीपवीरच्या जोडीसाठी खास आहे. त्यांचे चाहते ही दीपवीरच्या जोडीला एकत्र पाहण्यासाठी आतुर असतील यात काहीच शंका नाही. 

टाईम्सच्या रिपोर्ट दीपिकाने या सिनेमात रणवीर सिंगच्या पत्नीची भूमिका साकारण्यासाठी तब्बल 14 कोटींचे मानधन घेतले आहे. कंगना राणौतनेदेखील ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’साठी 14 कोटींचे मानधन घेतले होते. आजपर्यंत कुठल्याही अभिनेत्रीने एका चित्रपटासाठी इतके मानधन घेतले नव्हते. त्यामुळे कंगनानंतर दीपिका ऐवढे मानधन घेणारी दुसरी अभिनेत्री ठरली आहे.

 83बाबत बोलायचे झाले तर, दीपिका पादुकोण '८३' मध्ये कपिल देव यांची पत्नी रोमी भाटियांची भूमिका साकारणार आहे. दीपिकाने हे देखील सांगितले की, '८३' मध्ये कपिल देव यांची भूमिका रणवीर सिंगशिवाय आणखी कुणी साकारत असते तरी देखील मी हीच भूमिका केली असती. '८३' हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा आहे.

१९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता. सध्या या सिनेमाची टीम लंडनला शूटिंग करतेय. १९८३च्या क्रिकेट वर्ल्डकपवर आधारीत या चित्रपटात ताहिर राज भसीन सुनील गावस्करांच्या भूमिकेत, एमी ब्रिक बलविंदर संधूंच्या भूमिकेत, तमीळ अभिनेता जीवा कृष्णामचारी श्रीकांत यांच्या भूमिकेत, चिराग पाटील संदीप पाटील यांच्या भूमिकेत, आदिनाथ कोठारे, दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेत, धैर्य करवा रवि शास्त्री यांच्या भूमिकेत आणि साहिल खट्टर सैयद यांच्या भूमिकेत पहायला मिळणार आहेत.

हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांना १० एप्रिल, २०२० पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. 

टॅग्स :कंगना राणौतदीपिका पादुकोण