Join us

लेकीच्या जन्मानंतर पुन्हा कामावर परतणार दीपिका पादुकोण, 'कल्कि २'चं करणार शूटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 12:42 IST

लेकीच्या जन्मानंतर दीपिका पुन्हा कामावर जाण्यास सज्ज झाली आहे. लवकरच दीपिका 'कल्कि २' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. 

दीपिका पादुकोण ही बॉलिवूमधली आघाडीची अभिनेत्री आहे. काही महिन्यांपूर्वीच दीपिका आई झाली. दीपिकाने तिच्या आणि रणवीरच्या पहिल्या बाळाला जन्म दिला.आता लेकीच्या जन्मानंतर दीपिका पुन्हा कामावर जाण्यास सज्ज झाली आहे. लवकरच दीपिका 'कल्कि २' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. 

५ जानेवारीला दीपिकाचा वाढदिवस होता. तिच्या वाढदिवसानिमित्त 'कल्कि 2898 AD' सिनेमाच्या टीमकडून व्हिडिओ शेअर करत अभिनेत्रीला शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. 'कल्कि 2898 AD' सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचे काही सीन या व्हिडिओत दाखविण्यात आले होते. या व्हिडिओच्या शेवटी "लवकरच सिनेमाच्या सेटवर भेटू" असं म्हटलं गेलं होतं. त्यामुळे आता 'कल्कि 2898 AD'च्या दुसऱ्या भागाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार असून दीपिकादेखील प्रेग्नंसीच्या ब्रेकनंतर पुन्हा कामावर परतणार आहे हे कन्फर्म झालं आहे. 

दीपिकाने ८ सप्टेंबरला लेकीला जन्म दिला. प्रेग्नंसीच्या काळात तिने सिंघम अगेनचं शूटिंग केलं होतं. त्यानंतर मात्र तिने ब्रेक घेतला होता. दीपिका आणि रणवीरने लाडक्या लेकीचं नाव दुआ असं ठेवलं आहे. आता प्रेग्नंसी ब्रेकनंतर दीपिका पुन्हा कामावर परतणार आहे. 

दरम्यान, 'कल्कि 2898 AD' सिनेमा गेल्यावर्षी जून महिन्यात प्रदर्शित करण्यात आला होता. अमिताभ बच्चन, प्रभास, दीपिका पादुकोण, कमल हसन अशी या सिनेमाची स्टारकास्ट होती. आता 'कल्कि 2898 AD'चा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

टॅग्स :दीपिका पादुकोणसेलिब्रिटी