Join us

दीपिका पदुकोण लवकरच देणार गुडन्यूज? मुलांवर कसे संस्कार करणार यावरही केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2024 10:48 AM

फॅमिली प्लॅनिंगवर दीपिकाने मुलाखतीत उत्तर दिलं आहे.

दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) बॉलिवूडमधील मोस्ट पॉवरफुल कपल आहे. 2018 मध्ये दोघंही लग्नबंधनात अडकले. आता त्यांच्या लग्नाला ५ वर्ष झाली आहेत. दीपिकाने नुकतंच केलेलं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. यावरुन दीपिका लवकरच गुडन्यूज देणार का या चर्चेलाही उधाण आलं आहे. फॅमिली प्लॅनिंगवर दीपिकाने मुलाखतीत उत्तर दिलं आहे.

वोग सिंगापूरला दिलेल्या मुलाखतीत दीपिका म्हणाली, 'आम्हाला दोघांना लहान मुलं खूप आवडतात. आम्हीही त्या दिवसाची वाट पाहत आहोत जेव्हा आमचं कुटुंब सुरु होईल.' ती असंही म्हणाली,"जेव्हा मी लोकांना भेटते ज्यांच्यासमोर मी लहानाची मोठी झाली आहे माझे नातेवाईक, मित्रपरिवार नेहमी म्हणतात की माझ्यात जरासुद्धा बदल झालेला नाही. हे माझ्यावरील संस्कारांमुळेच आहे."

आपल्या मुलांना असे संस्कार देणार दीपिका

दीपिका म्हणाली, "या इंडस्ट्रीत पैसे आणि प्रसिद्धीमुळे प्रभावित होणं सोप्पं आहे. पण घरात कोणीही मला सेलिब्रिटी सारखं वागवत नाहीत. मी सर्वात आधी मुलगी आणि बहीण आहे. यात कोणताही बदल व्हावा असं मला वाटत नाही. माझं कुटुंब मला जमिनीशी जोडून ठेवतं. रणवीर आणि मला ही आशा आहे की आमच्या मुलांनाही आम्ही असेच संस्कार देऊ."

वर्कफ्रंट

दीपिका पदुकोण आगामी 'फायटर' सिनेमात दिसणार आहे. यामध्ये हृतिक रोशनसोबतची तिची सिझलिंग केमिस्ट्री बघायला मिळणार आहे. २५ जानेवारी रोजी सिनेमा रिलीज होत आहे. 

टॅग्स :दीपिका पादुकोणरणवीर सिंगबॉलिवूडपरिवार